नवी दिल्ली, 28 जून : टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये असून टेस्ट, टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्याची तयारी सुरू आहे. या दिवसांमध्ये खेळाडूंव्यतिरिक्त इतर अनेक स्टार्सही इंग्लंडला पोहोचले आहेत, त्यापैकी एक म्हणजे माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. अर्जुन तेंडुलकर काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला पोहोचला आहे. दरम्यान, त्याचा एक फोटो समोर आला आहे जो खूप चर्चेत आहे. इंग्लंड महिला संघाची क्रिकेटपटू डॅनियल वेटने तिच्या इंस्टाग्रामवर अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो शेअर केला आहे. अर्जुन तेंडुलकर येथे डॅनियल वेटसोबत जेवणाचा आनंद घेत आहे. डॅनियल वेट आणि अर्जुन तेंडुलकर यांनी लंडनमधील सोहो रेस्टॉरंटमध्ये जेवण केले, ज्याचा फोटो व्हायरल होत आहे. अर्जुन आणि डॅनियल वेट हे चांगले मित्र आहेत, अर्जुन जेव्हाही इंग्लंडमध्ये असतो तेव्हा दोघेही भेटतात. यापूर्वीही दोघांचे फोटो समोर आले आहेत. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार अर्जुन तेंडुलकर नुकताच इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससोबत होता. अर्जुन तेंडुलकरला या मोसमात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याचे पदार्पण होईल असे अनेकवेळा वाटत होते, पण अर्जुनची प्रतीक्षा वाढतच गेली. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम दुसरीकडे, डॅनियल वेटबद्दल बोलायचे झाल्यास 31 वर्षीय महिला क्रिकेटर इंग्लंडची एक मोठी स्टार खेळाडू आहे. डॅनियल वेटने इंग्लंडकडून 93 सामने खेळले आहेत, ज्यात तिने 1500 धावा आणि 27 विकेट घेतल्या आहेत.124 टी-20 सामन्यांमध्ये डॅनियलच्या जवळपास 2 हजार धावा आणि 46 विकेट आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात डॅनियल वेटही इंग्लंड-अ संघात होती, त्यात तिला फक्त 8 धावा करता आल्या.