मुंबई, 19 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपमध्ये पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. गतविजेत्या फ्रान्सला फर्स्ट हाफमध्ये एकही गोल करता आला नव्हता. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचेच वर्चस्व राहिले. मात्र सेकंड हाफमध्ये अखेरची दहा मिनिटे शिल्लक असताना फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने दीड मिनिटात सामन्याचं चित्र पालटून टाकलं. अवघ्या ९७ सेकंदात त्याने लागोपाठ दोन गोल करून सामना बरोबरीत आणला. एम्बाप्पेनं डबल धमाका केल्यानं फ्रान्सने सामन्यात पुनरागमन केलं. पहिला गोल ८० व्या मिनिटाला पेनल्टीवर केला. त्यानतंर फुटबॉलमध्ये वेगाचा बादशहा असणाऱ्या एम्बाप्पेनं आपल्या याच वेगाच्या जोरावर अर्जेंटिनाची बचावफळी भेदत बॉल गोलपोस्टमध्ये मारला. त्याच्या दुसऱ्या गोलने फक्त अर्जेंटिनाच नाही तर फुटबॉल चाहत्यांच्याही काळजाचा ठोका चुकवला. तासभराहून अधिक काळ अर्जेंटिनाचं वर्चस्व असलेल्या सामन्यात यामुळे फ्रान्सची आक्रमक अशी एन्ट्री झाली. हेही वाचा : FIFA : वर्ल्ड कप जिंकले तरी विजेत्यांना खरी ट्रॉफी देत नाहीत, कारण…
सामन्याच्या २१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा डी मारिया फ्रान्सच्या पेनल्टी बॉक्समध्ये बॉल घेऊन आला. डाव्या बाजूने बॉक्समध्ये पोहोचताच फ्रान्सच्या ओस्मानकडून फाउल झाला. यानंतर अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली आणि मेस्सीने २३ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फर्स्ट हाफमध्ये डी मारियाने गोल केल्यानं अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली. याच गोलच्या जोरावर फ्रान्सला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. नंतर अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांकडून एक एक गोल झाला. तर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सच्या दोन पेनल्टी मिस झाल्या आणि अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.