JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 13 चौकार, 9 सिक्स अन् 134 रन्स, पृथ्वी शॉची तडाखेबाज खेळी!

13 चौकार, 9 सिक्स अन् 134 रन्स, पृथ्वी शॉची तडाखेबाज खेळी!

मुंबई टीमकडून खेळताना पृथ्वीने आसामविरुद्ध फक्त 46 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली. त्याने 61 बॉलमध्ये 134 रन्स काढल्या.

जाहिरात

मुंबई टीमकडून खेळताना पृथ्वीने आसामविरुद्ध फक्त 46 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली. त्याने 61 बॉलमध्ये 134 रन्स काढल्या.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर :  सन 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेस्ट मॅचमध्ये पदार्पणातच शतक झळकावणारा भारताचा ओपनर बॅट्समन पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत झंझावती खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मॅच खेळताना दिसत नव्हता; पण मुंबई टीमकडून खेळताना पृथ्वीने आसामविरुद्ध फक्त 46 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली. त्याने 61 बॉलमध्ये 134 रन्स काढल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सीरिज खेळवली गेली. यात टीममध्ये स्थान न मिळाल्याने पृथ्वीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. पण आसाम विरुद्धच्या सामन्यात दमदार बॅटिंगनंतर पृथ्वीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शुक्रवारी ही मॅच झाली. यात सुरूवातीला बॅटिंग करताना मुंबईने तीन विकेट गमावून 230 रन केल्या. नंतर आसामची टीम मात्र 19.3 ओव्हरमध्ये 169 धावांत बाद झली. ( 16 टीम, 45 सामने, एक ट्रॉफी; पाहा भारतात किती वाजता सुरु होणार वर्ल्ड कप सामने? ) सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये पृथ्वीने 13 फोर आणि 9 सिक्स खेचले. यशस्वी जायस्वालसोबत (30 बॉलमध्ये 42 रन्स) पृथ्वीने तिसऱ्या विकेटसाठी 114 रन्सची भागिदारी केली. पृथ्वीनं 19 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी व 46 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली. या आधी पृथ्वीनं मध्य प्रदेशविरुद्ध 29 आणि मिझोरामविरुद्ध नाबाद 55 रन्सची खेळी केली. 22 वर्षीय पृथ्वी शॉ जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय टीममधून खेळला होता. आसामच्या रझाकुद्दीन अहमदच्या सर्वाधिक 39 धावा मुंबईने दिलेल्या 231 रन्सचा पाठलाग करताना आसाम टीममधील रझाकुद्दीन अहमदने 26 बॉल्समध्ये सर्वाधिक 39 रन्स केल्या. इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सतर्फे खेळणाऱ्या रियान परागने 10 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. तर मुंबई टीमकडून तुषार पांडेने 25 रन देत 2 विकेट घेतल्या. ग्रुपमधील इतर सामन्यांत उत्तराखंडने मध्य प्रदेश टीमला 50 धावांनी पराभूत केलं. उत्तराखंडने दोन विकेट गमावून 194 रन काढल्या. पण मध्य प्रदेशचा संघ 144 धावांतच गारद झाला. नेटिझन्स मते, हा तर टीम इंडियाचा ओपनर आसामविरुद्धच्या दमदार खेळीनंतर ट्विटरवर पृथ्वी शॉचं खूप कौतुक केलं जात आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर पृथ्वी ओपनर होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं दिली. (T20 WC : टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यासाठी रोहितला पार करावं लागेल ‘हे’ आव्हान) तर आता पृथ्वीला टी-20 संघात स्थान मिळायला हवं, अशी अपेक्षा एकाने व्यक्त केली. एका चाहत्याने तर त्याच्या वयावरून मजेशीर कमेंट केली. चार वर्षांपूर्वी पृथ्वी 12 वर्षांचा दिसायचा आता तो चक्क चाळिशी उलटलेला व्यक्ती दिसतोय, असं त्या चाहत्यानं कमेंटमध्ये म्हटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या