JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / श्रीरामानं घेतलं होतं दर्शन, सप्तश्रृंगी मंदिराचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? पाहा Video

श्रीरामानं घेतलं होतं दर्शन, सप्तश्रृंगी मंदिराचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? पाहा Video

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकमधील सप्तश्रृंगी मंदिराचं रहस्य तुम्हाला माहिती नसेल…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 10 मे : महाराष्ट्राच्या धार्मिक इतिहासात नाशिकचं स्थान मोठं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या वास्तवानं पावन झालेल्या नाशिकला मंदिरांची नगरी असे म्हणतात. इथं 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून लाखो भाविक येतात. त्र्यंबकेश्वर प्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवी देखील भाविकांते श्रद्धास्थान आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचं रहस्य काय आहे ? मंदिराचा इतिहास काय आहे ? वणी गडावर देवीचं स्थान कस निर्माण झालं? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. सप्तशृंगी देवीचं रहस्य सात पर्वतरांगांमधील हे महत्वाचं शक्तीपीठ मानल जात आहे.माता सप्तशृंगीने म्हैशासुराचा वध केल्यानंतर याच पर्वताच्या पायथ्याशी विश्रांती घेतल्याची माहिती देवी भागवत आणि पुराणात असल्याचं मत अभ्यासकांचे आहे. या देवीला एकूण सोळा प्रकारच्या भूजा आहेत.त्यामुळे देवीला षोडश भूजा मातेश्वरी म्हंटलं जातं. भक्तांच्या कल्यानासाठी देवीने हे रूप धारण केलं होत,हे पूर्ण शक्तीपीठ आहे मात्र कालांतराने याला अर्ध शक्तीपीठ मानल गेलं आहे, अशी माहिती धर्मशास्त्र अभ्यासक डॉ.नरेंद्र धारणे यांनी दिली आहे.

श्रीरामानं घेतलं दर्शन श्रीराम 14 वर्षे वनवास भोगत असताना त्यांचं नाशिक मधील पंचवटीमध्ये बराच काळ वास्तव्य केलं,त्यानंतर त्यांनी वणी गडावर जाऊन सप्तशृंगी देवीचं दर्शन देखील घेतल असा उल्लेख पुराणात आढळून येतो,तसेच नाथ संप्रदायाचे शक्तीपीठ शाबरी विद्या या ठिकाणी झाल्याचा  उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये आहे, असं धारणे यांनी सांगितलं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनीही सुरतेची लूट करुन आल्यानंतर वणी गडावर जाऊन देवीचं दर्शन घेतल्याचा उल्लेख अनेक    बखरीमध्ये आढळतो. त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आहे. कसा तयार झाला गड? भगवान हनुमान जेव्हा संजीवनी पर्वत लक्ष्मणासाठी घेऊन जात होते तेव्हा,त्यातील काही भाग इथ पडला आणि तेव्हा सप्तशृंगी गड तयार झाला असा उल्लेख पुराणा्त आढळतो. हा प्राचीन पर्वत असून विशेष शक्तीपीठ असल्याची भाविकांची श्रद्धा आहे, असं डॉ. धारणे यांनी स्पष्ट केलं. महादेवाच्या पिंडीखाली सापडलं 700 वर्ष जुनं सोन्याचं कासव! PHOTOS कुठे आहे सप्तशृंगी गड ? सप्तशृंगी गड हा नाशिक शहरापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात वसलेला आहे.खाजगी किंवा सरकारी बसने आपण तिथपर्यंत पोहचू शकतो. सकाळी मंदिर 6 वाजता भाविकांना दर्शनासाठी खुलं होतं. तर, रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं असतं. या काळात भाविक सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊ शकतात. भाविकांना कोणत्या सुविधा? सप्तश्रृंगी मंदिर ट्रस्टकडून भाविकांना  अल्प दरात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आली आहे.  ज्या भाविकांना व्हीआयपी सुविधा हवी असेल त्यांच्यासाठी देखील व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. भक्तनिवासमध्ये साध्या रूम पासून तर अत्याधुनिक रूम देखील उपलब्ध आहेत.अत्याधुनिक सुविधेसाठी भाविकांना थोडे जास्त पैसे मोजावे लगतात.तसेच भाविकांना निवारा शेड उभारण्यात आले आहेत.पेड दर्शनाची देखील व्यवस्था उभारण्यात आली आहे,मात्र ती ऐच्छिक आहे. कुठे गायब होतो प्रवाह, गोदावरीचं गूढ अजूनही कायम, या तज्ज्ञांकडे आहे याचं उत्तर मंदिर प्रशासन आणि सरकारच्या संयुक्त विद्यमाने गडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे.जे भाविक पायऱ्यांनी जाऊ शकत नाही. तसंच ज्यांना कमी वेळेत ज्यांना दर्शन घ्यायचं आहे, ते याचा वापर करू शकतात. त्यासाठी एका व्यक्तीला साधारण 110 रुपये मोजावे लागतात.  दीव्यांग व्यक्तींसाठी देखील सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे.दिवसभरात तीन वेळा आरतीचे नियोजन असते, आरती देखील पेड स्वरूपात उपलब्ध आहे. ज्या भाविकांना आरती करायची आहे,ते बुकिंग करून आरती करू शकतात, अशी माहिती सप्तशृंगी देवी मंदिर विश्वस्त ॲड.दिपक पाटोदकर यांनी दिली आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या