JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Nakshatra: पुनर्वसु नक्षत्र अन् तरणा पाऊस झाला सुरू! वाहन गाढव कमाल दाखवणार का?

Nakshatra: पुनर्वसु नक्षत्र अन् तरणा पाऊस झाला सुरू! वाहन गाढव कमाल दाखवणार का?

Nakshatra change : यावेळी वृश्चिक लग्न असून वाहन गाढव आहे, ग्रह योगांचा विचार करता या नक्षत्राचा कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस होण्याची चिन्हे आहेत. परंतु…

जाहिरात

पाऊसाचे वाहन गाढव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जुलै : पंचाग आणि पूर्वीच्या रुढी-परंपरानुसार काल सायंकाळपासून तरणा पाऊस सुरू झाला आहे. कारण काल नवीन नक्षत्र सुरू झालं आहे. काल गुरुवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी सायंकाळी पाच वाजून 26 मिनिटांनी सूर्याचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश झाला. यावेळी वृश्चिक लग्न असून वाहन गाढव आहे, ग्रह योगांचा विचार करता या नक्षत्राचा कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस होण्याची चिन्हे आहेत. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही. दिनांक 07 ते 09, 13 ते 16 आणि 19 जुलै रोजी चांगला पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती पंचांगामधून सांगण्यात आली आहे. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रथा आणि परंपरा वर्षानुवर्ष चालत आल्या आहेत. सध्या सर्वत्र पावसाळ्याला सुरूवात झालीय. पावसाळ्यातील वेगवेगळ्या नक्षत्रांचा अंदाज हा परंपरेनुसार बांधला जातो. विशिष्ट नक्षत्राला सुरू होणाऱ्या पावसाला तरणा पाऊस, म्हातारा पाऊस, सुनेचा पाऊस तसंच सासूचा पाऊस असं म्हंटलं जातं. या प्रकारच्या नावांचं कारण काय आहे? हे ठाण्यातील सुप्रसिद्ध पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितलंय.

गुरुवार 6 जुलै रोजी सूर्याने पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश केला. या नक्षत्रात पडणाऱ्या पावसालाच तरणा पाऊस असे म्हणतात. पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांनी या पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणाऱ्या पावसांना गमतीशीर नावं ठेवली आहेत. पुनर्वसु नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हणतात. पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ असं म्हंटलं जातं. आश्लेषा नक्षत्रातील पावसाचं ‘आसळकाचा पाऊस’ तर मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो. म्हणून मघा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात, अशी माहिती सोमण यांनी दिली. महाराष्ट्रील बहुतांश ग्रामीण भागात नक्षत्र आणि वाहनावरून पाऊस कसा पडला किंवा पडेल याविषयी लोक चर्चा करतात. सूर्यास्तानंतर या गोष्टी करणं अशुभ; सुखी संसाराला लागते दृष्ट, आनंद हरपतो राज्यात अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जिथे पेरणी झाली आहे, तिथला शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतीसाठी हवा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच नक्षत्र बदललं असून तरणा पाऊस सुरू झाला असून वाहन गाढव आहे, या नक्षत्राकडून शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या