JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / पितृ दोष दूर करण्यासाठी कोणतीही शांती न करता पैसा आणि वेळ वाचेल असे उपाय !

पितृ दोष दूर करण्यासाठी कोणतीही शांती न करता पैसा आणि वेळ वाचेल असे उपाय !

तुमची पितरे शांत नसतील तर देवाचा आशिर्वादही ते तुमच्या पर्यंत पोहोचून देत नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई,12 डिसेंबर :**पितृ दोष दूर करण्यासाठीचे उपाय प्रभावी असावे. पंरतु त्याच बरोबर पैसा व वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होऊन जास्तीत जास्त फायदेशीर ठरावेत. बहुतेक वेळा जातकाला होणारा त्रास हा राहू-केतू मुळे निर्माण झालेला असतो. त्यालाच आपण  पितृ दोष म्हणतो.

त्यावरील उपाय पुढील प्रमाणे.

१) ज्याच्या पत्रिकेत पितृ दोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनेमाने दहीभात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल.

२) एक तांब्याभर पाण्यामध्ये ,एक चमचा दूध,  एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी  पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात 7, 14, 21 .. प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे उदा -आई-वडील, आजी-आजोबा, पणजोबा- पणजी, किंवा अन्य कोणी असेल तर त्यांच्या नावाने तसेच आईच्या इकडचे आई-वडील आजी-आजोबा तसेच पणजोबा-पणजी यांचेही स्मरण करावे. प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पितरां समर्पयामि असे म्हणावे.

‘अपना टाइम’ आलाच! घड्याळात अनेकदा 11:11 वाजलेले दिसतात का? नशीब बदलण्याची हीच ती वेळ

 ३) एक कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सदगती, मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय फक्त रविवार सोडून इतर वाराला करावा.

या पैकी कोणताही एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृ दोष दूर होतो.पंरतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी. यामुळे घरात आकस्मात संकटे वास्तू दोष, सर्प दोष, कुंडली दोष आकस्मिक मृत्यू, अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाहीत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या