JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / मागच्या जन्मातील आपल्याला काहीच कसं आठवत नाही? लहान मुलांना मात्र 'त्या' गोष्टी..

मागच्या जन्मातील आपल्याला काहीच कसं आठवत नाही? लहान मुलांना मात्र 'त्या' गोष्टी..

आपल्या मेंदूची रचना आणि कार्य अशा प्रकारे बनलेले आहे, की आपण आपल्या भूतकाळातील आठवणी नेहमी लक्षात ठेवू शकत नाही. आपली बुद्धी अशा प्रकारे कार्य करते की…

जाहिरात

पूर्वीच्या जन्मातील का आठवत नाही

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 मे : लहान मुलांना त्यांचा मागचा जन्म आठवत असतो, असे अनेकांचे म्हणणे आपण ऐकले असेल. जेव्हा मुले मोठी होऊ लागतात तेव्हा त्यांच्या मागील जन्माच्या आठवणी लक्षात राहणं कमी होत जातं. पूर्वजन्माला केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर इतर अनेक प्राचीन धर्मांमध्येही मानलं जातं. विज्ञानाबद्दल बोलायचे झाल्यास विज्ञान पूर्वजन्म हे एक आव्हान मानते. ज्यावर बरेच संशोधन केलं जात आहे, परंतु या विषयाचं रहस्य सोडवणं तसं अद्याप खूप क्लिष्ट काम आहे. जेव्हा आपण मागच्या जन्माबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या मनात विचार येतो की, आपल्याला आपला मागील जन्म का आठवत नाही. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून याविषयी वैज्ञानिक आणि धार्मिक पैलू जाणून घेऊया.

वैज्ञानिक दृष्टिकोन - वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आपल्या मेंदूची रचना आणि कार्य अशा प्रकारे बनलेले आहे, की आपण आपल्या भूतकाळातील आठवणी नेहमी लक्षात ठेवू शकत नाही. आपली बुद्धी अशा प्रकारे कार्य करते की, आपल्याला नवीन गोष्टी आठवतात आणि जुन्या विसरल्या जातात. यामुळे मेंदूवर अनावश्यक आठवणींचा भार पडत नाही आणि तो व्यवस्थित काम करत राहतो. अनेकदा आपल्या आयुष्यात अनेक वाईट घटना घडतात. ज्याला विसरून आपण नवीन जीवन सुरू करतो, जर मानवी मेंदू जुन्या गोष्टी विसरू शकत नसेल तर नवीन जीवन सुरू करणे अशक्य होईल. या कारणास्तव, आपल्याला आपल्या मागील जन्माच्या गोष्टी आठवत नाहीत, असे सांगितले जाते. मे महिन्यात 3 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन; या 6 राशींना संपूर्ण महिना आनंदी धार्मिक श्रद्धांनुसार - जर एखाद्या व्यक्तीला कदाचित अचानक आठवले की, तो मागील जन्मी कसा मेला किंवा मागील जन्मात तो कोणते काम करत असे. त्यामुळे या जन्मातही त्याला या गोष्टींची भीती राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या दु:खापासून मुक्ती हवी असते. हे देखील एक कारण आहे की, लहान मुलांना त्यांचा मागील जन्म आठवतो आणि ते मोठे झाल्यावर ते विसरतात. नाहीत येत नकारात्मक विचार, मन प्रसन्न राहतं; गायत्री मंत्राचा जप करण्याचे फायदे भारतातील सर्वात जुनी विद्या संमोहन आजच्या काळात देखील वापरली जाते. सध्याच्या काळात संमोहनाचा उपयोग एखाद्याच्या भूतकाळातील जीवनाची आठवण करून देण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. आजही अनेक लोक या ज्ञानाचा उपयोग लोकांना त्यांच्या मागील जन्माची आठवण करून देण्यासाठी करतात. तरीही त्या व्यक्तीने जे काही लक्षात ठेवले ते खरे आहे की नाही हे पूर्णपणे निश्चित नसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या