JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / गंगोत्री ते रामेश्वरम... नागा साधूंची रोमांचक यात्रा, 4000 किलोमीटरचा प्रवास का आणि कसा करताय?

गंगोत्री ते रामेश्वरम... नागा साधूंची रोमांचक यात्रा, 4000 किलोमीटरचा प्रवास का आणि कसा करताय?

हे नागा साधू प्रत्यक्षात 4000 किलोमीटर लांब साष्टांग नमस्कार यात्रेवर निघाले आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दासरी क्रांति कुमार, प्रतिनिधी

संबंधित बातम्या

तेलंगाना, 20 मे : आजकाल अनेक नागा साधू तेलंगणाच्या रस्त्यावर एकत्र साष्टांग नमस्कार करताना दिसतात. त्यांच्यासोबत एक वाहनही चालत आहे, ज्यामध्ये या साधूंसाठी अन्न आणि इतर आवश्यक गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे नागा साधू प्रत्यक्षात 4000 किलोमीटर लांब साष्टांग नमस्कार यात्रेवर निघाले आहेत आणि रस्त्यावर अशा प्रकारे साष्टांग नमस्कार करून तामिळनाडूपर्यंत जाणार आहेत. यामागचे कारण काय आहे, हे जाणून घेऊयात. ‘विश्व कल्याण’साठी म्हणजेच जगाच्या भल्यासाठी गंगोत्री ते रामेश्वरमपर्यंत साष्टांग नमस्कार करणारे हे साधू मूळचे मध्य प्रदेशचे असून त्यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात उत्तराखंडमधून हा प्रवास सुरू केला होता. कडाक्याच्या उन्हाळ्यात हे साधू डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्यांवर जवळपास लोळत फिरताना पाहून आश्चर्य वाटते.

डोंगरातून सुरू झालेला हा प्रवास तेलंगणातील भद्राद्री काठगोदाम जिल्ह्यात पोहोचला आहे. येथे भद्राचलम श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिरात या साधूंनी विशेष प्रार्थना पूजाही केली. हे साधू पहाटे साष्टांग दंडवत यात्रा सुरू करतात आणि रात्री विश्रांती घेतात. मधे-मधे ब्रेक घेतला जातो. साष्टांग नमस्कार म्हणजे काय? कपाळापासून पायाच्या बोटांपर्यंत शरीराचे आठ प्रमुख भाग जमिनीला स्पर्श करतात अशा प्रकारे तुम्ही शरीराला जमिनीला लावता तेव्हा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. एखाद्या इष्ट देवतेबाबत आदर आणि भक्ती व्यक्त करण्याची ही पद्धत आहे. साष्टांग नमस्कार करणार्‍या नागा साधू यांनी सांगितले की, साष्टांग नमस्कारासाठी जमिनीवर डोके, डोळे, कान, तोंड, हात, मांड्या आणि पाय यांचा स्पर्श करावा लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या