हिंदू धर्मात अस्थिकलश गंगा नदीत विसर्जित का करतात?
मुंबई, 19 ऑक्टोबर : नुकतेच देशातील सर्वोच्च नेते आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं. त्यांचा मुलगा अखिलेश यांनी हरिद्वार येथील गंगा नदीत त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले. हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर अस्थिकलश गंगेत का विसर्जित केला जातो? त्यामागचं कारण काय आहे? गंगा नदीपर्यंत जाणे शक्य नसल्यास जवळच्या कुठल्याही नदीत किंवा संगम झालेल्या ठिकाणी अस्थी सोडल्या जातात.
हिंदू धर्मात
, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचे अंतिम संस्कार केले जातात. या अंत्यसंस्कारात मृतदेहाला अग्नी दिला जातो. या प्रक्रियेत शरीराचे सर्व अवयव अग्नीशी एकरुप होतात. फक्त हाडांचे अवशेष शिल्लक राहतात. यालाच अस्थी असं म्हणतात. अस्थी गंगेत का सोडतात? अंत्यसंस्कारात अग्नी दिल्यानंतर ही राख मातीच्या भांड्यात गोळा केली जाते. सामान्यतः गंगेच्या काठावर अंत्यसंस्कार होत असतील तर अंत्यसंस्कारानंतरच अस्थिकलश नदीच्या पाण्यात विसर्जित केला जातो. मात्र, जर तेथे अंतिम संस्कार झाले नाहीत तर हे अस्थिकलश घरी आणले जाते. विसर्जित होईपर्यंत ते घराबाहेर झाडावर टांगून ठेवतात. त्यानंतर 10 दिवसांच्या आत अस्थिकलश गंगा नदीत किंवा कोणत्याही पवित्र नदीत विसर्जित केले जाते. तसे, प्राचीन ग्रंथांमध्ये, गंगा नदीत अस्थी विसर्जन करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. पण, गंगा नदीत अस्थिकलश का विसर्जित केला जातो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. धार्मिक श्रद्धा काय आहे? हा निव्वळ धर्म, प्रथा आणि हिंदू धर्मात सांगितलेल्या पद्धतींचा विषय आहे. गरुड पुराणात याबद्दल एक कथा सांगितली आहे. गरुड पुराणातील दहाव्या अध्यायात वर्णन केलेल्या कथेनुसार, पक्षीराज गरुड भगवान विष्णूला विचारतो की जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो, तेव्हा मृताचे नातेवाईक त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात. मात्र, मृत्यूनंतर अस्थी का साठवतात? आणि ती गंगा नदी किंवा पाण्यात का विसर्जित करतात? वाचा -
क्षुल्लक वाटणाऱ्या या गोष्टी केल्यानं मागे लागू शकते शनीची साडेसाती गरुडाचा प्रश्न ऐकून भगवान विष्णू सांगतात, मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या चौथ्या दिवशी अस्थिकलशासाठी स्मशानभूमीत स्नान करून पवित्र होतात. त्यानंतर चितेच्या राखेतून मृत व्यक्तीची राख निवडतात. असे मानले जाते की मृत्यूनंतर 10 दिवसांच्या आत अस्थिकलश गंगेत विसर्जित केल्यावर मृताचा आत्म्याला शांत मिळते. गंगा त्याची सर्व पापे नष्ट करते.
गंगा नदी धरतीवर आल्याची आख्यायिका आपल्या पूर्वजांना वाचवण्यासाठी महाराज भगीरथ यांनी धरतीवर गंगा नदी आणली होती, असे आपल्या पौराणिक कथाही सांगतात. त्यामुळे त्यांच्या सर्व पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळाली होती.
हाडांच्या विसर्जनाचा वैज्ञानिक आधार वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, हाडांमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम असते, जे जमीन सुपीक बनवण्यासाठी उपयुक्त आहे. जेव्हा आपण गंगा नदी किंवा दूर वाहणाऱ्या कोणत्याही नदीमध्ये अस्थी (हाडे) विसर्जित करतो तेव्हा नदीच्या आसपासची जमीन पाण्यामुळे सुपीक बनते. यासोबतच पाण्यात राहणाऱ्या जीवांसाठी पोषक आहारही आहे. रात्री अंत्यसंस्कार का केले जात नाहीत? आता अंत्यसंस्कार रात्री सुद्धा केले जातात. मात्र, ते रात्री करू नयेत, असा बराच काळापासून समज आहे. वास्तविक, हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी अंतिम संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. हिंदू ग्रंथ आणि श्रद्धांमध्ये चालू असलेल्या चालीरीती सांगते की सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार कधीही केले जाऊ नयेत. त्यासाठी सकाळपर्यंत वाट पहावी लागेल. कारण रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करणे आत्म्याच्या शांतीसाठी योग्य नाही.