Chanakya Niti : अशा लोकांसोबत कधीही वाद घालू नका
चाणक्य नीतिशास्त्रानुसार, रागाच्या भरात काही लोकांशी कधीही भांडण करू नये. जाणून घेऊया त्या कोणत्या व्यक्ती आहेत
नातेवाइकांशी भांडण करू नका : चाणक्य नीतीनुसार, जवळचे नातेवाईक अनेकदा आपलं चांगलं-वाईट समजून घेतात
भविष्यात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारे कुटुंबीय तुमच्यापासून दूर जातात आणि तेव्हा फार उशीर झालेला असतो
मुर्ख लोकांशी वाद घालू नका : चाणक्य यांच्या मते, मूर्ख लोकांशी भांडण करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्याचा प्रकार आहे
अशी माणसे आपले मत दुसऱ्याला सांगताना नेहमीच वाद घालतात, अशा लोकांसाठी तुमचा वेळ वाया घालवू नका
मित्रांशी भांडू नका : मैत्रीचे नाते हे जीवनातील खास नाते आहे. हसण्या-विनोद व्यतिरिक्त संपूर्ण गुपित शेअर करण्यापर्यंत मैत्री प्रत्येक पावलावर साथ देते
काही छोटा वादातून आपला सर्वात चांगला मित्र गमावणं वाईट आहे. भविष्यात आपल्याला मित्रांचीच गरज पडते
शिक्षकाशी भांडू नका : प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. एक चांगला शिक्षक जीवनात तुमचा मार्गदर्शक ठरू शकतो
काही लोक अनेकदा गुरुवर रागावतात किंवा वाईट बोलतात. परंतु यामुळे तुम्ही ज्ञानापासून देखील दूर राहातात