JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Video : साडेचार हजार वर्ष जुन्या संस्कृतीचा पुरावा असलेलं तापी नदीवरील प्रतीकाशी

Video : साडेचार हजार वर्ष जुन्या संस्कृतीचा पुरावा असलेलं तापी नदीवरील प्रतीकाशी

महाराष्ट्रात तापी नदीच्या किनाऱ्यावर साडेचार हजार वर्ष जुन्या संस्कृतीची ओळख सांगणारं गाव असून याला प्रतिकाशी म्हणूनही ओळखले जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नंदूरबार, 29 डिसेंबर : महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातही महत्त्वाची अशी धार्मिक क्षेत्र आहे. या धार्मिक क्षेत्रांच्या यादीत प्रकाशा या गावाचा वरचा क्रमांक आहे.  येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काशी यात्रा पूर्ण होते, असं मानलं जातं. या मंदिराबाबत महत्त्वाची अख्यायिका सांगितली जाते. काय आहे अख्यायिका? पूर्वीच्या काळी सहा महिन्याची रात्र आणि सहा महिन्यांचा दिवस असताना  प्रकाशामध्ये महादेवाची 108 मंदिरे बांधण्याचा संकल्प करण्यात आला होता. पण, शेवटचं मंदिर बांधताना सूर्योदय झाला आणि हे काम अपूर्णच राहिलं. त्यामुळे या गावाला काशी हे नाव न देता प्रकाशा हे नाव देण्यात आलं. प्रकाशाला केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. संपूर्ण देशात पुष्पदंतेश्वर महादावेची फक्त दोन मंदिरं असून यापैकी एक प्रकाश्यात आहे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांसाठी विशेष सुविधा प्रकाश्यातील  संत दगडू महाराज यांचे देखील मंदिर आहे .या मंदिराच्या सभामंडपात अखंड हरिनाम सुरू असतो. नर्मदा परिक्रमा करणारे पदयात्री भावीकही येथे विश्रांतीसाठी थांबतात. या सर्व भाविकांसाठी औषधोपचार ,राहणे ,खाणे या सर्व सुविधा मोफत आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी दिली. शबरीमलाच्या धर्तीवर नगरमध्ये मकर विल्लकू महोत्सव, वाचा काय आहे खास साडेचार हजार वर्षांचा वारसा प्रकाशाला प्राचीन वारसा लाभलेला आहे. भारतीय पुरातत्व खात्याने 1955 च्या सुमारास येथे केलेल्या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. इतिहासात ही ‘सावळदा संस्कृती म्हणून परिचीत असून ती कृषीप्रधान ग्रामीण संस्कृती होती. इसवीसन पूर्व 2500 ते 2000 हा येथील काळ आहे. साडेचार हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीचे अवशेष इथं आढळतात. साडेचार हजार वर्षा पासून मानवाच्या संस्कृतीचे अवशेष इथे आढळतात. प्रकाशा येथे अनेक शिलालेख उपलब्ध होतात. या शिलालेखात प्रकाशा हे ‘विषय’ म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण होते, असा उल्लेख आहे. देवगिरीचा यादव राजा सिंघण महाराजांच्या काळातील शके 1156 म्हणजे इ.स. 1233-34 मधील देखील शिलालेख प्रकाशामध्ये मिळालेला आहे.

स्कंद पुराणात उल्लेख अठरा पुराणातील ‘स्कंद पुराण’ यातील सहावा खंड हा ‘तापी महात्म्य’ आहे. या तापी महात्म्यातील नवव्या अध्यायात प्रकाशा तीर्थक्षेत्राची माहिती आहे. श्रीरुद्र उवाचं, प्रकाशकमिदं तीर्थ सर्वपापप्रणाशनम् । प्रकाशत्वं गता यत्र पयोष्यांतर्गता सरित ॥ सर्व देवमिदं क्षेत्र दुर्लभं वत्स भूतले । अशेषं पाप दहनं विशेषाद्योत्तरायणे । अर्थ- श्रीरुद्र (भगवान शंकर) म्हणले, ‘सर्व पापांचे नाश करणारे असे हे प्रकाशा तीर्थक्षेत्र आहे. लुप्त झालेली पयोष्णी नदी प्रकाशाला प्रकट झाली आहे. हे वत्स, पृथ्वीवर हे क्षेत्र प्राप्त होणे मोठे दुर्लभ आहे. स्वासकरून उत्तरायणात या क्षेत्री तापोस्नानाने सर्व पापांचा नाश होतो." प्रकाशा क्षेत्री श्री सिध्देश्वर महोदव मंदिर आहे. गोमाई आणि तापी संगम येथे झाला आहे. अमावस्येच्या दिवशी स्नानाने तसेच या क्षेत्री पितृलोकांना स्मरूण पिंडदान केल्याने त्यांना मोक्ष उत्तरायणाच्या मुहूर्तावर उपरोक्त दिल्याने विशेष पुण्याची प्राप्त होते . दूरदूरच्या गावातील शहरातील,राज्यातील लोक प्रकाश्याला येतात. औरंगाबादेतील महादेवाचं मंदिर बांधायला लागली तब्बल 100 वर्षे .. मंदिरात कोणती आरती होते? प्रकाश्याला केदारेश्वर व काशिविश्वेश्वराचे शिवालय प्रमुख आहे. येथे संध्याकाळी 7 वाजता शिवाची आरती होते त्यानंतर सर्व मंदिरामध्ये आरती केली जाते.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

कसे पोहचाल? प्रकाशा हे शहादा पासून 13 किलोमीटर आणि नंदुरबार पासून किलोमीटर अंतरावर वसलेले धार्मिक स्थळ आहे. शहादा आणि नंदुरबार येथून बस सेवा, रिक्षा या वाहनानी दर्शनाला जाता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या