अहमदनगर, 29 डिसेंबर : मूळच्या केरळमधील रहिवाशांनी नगर च्या सावेडी भागात बांधलेल्या अयप्पा मंदिरात सध्या मकर विल्लकू महोत्सव सुरू आहे. तब्बल दोन महिने हा उत्सव चालतो. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमचे आयोजन देखील येथे केले जाते. तर मंदिराची सजावट केली जाते. कर्नाटकातील शबरीमलाच्या धर्तीवर अहमदनगरमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. नोकरी व व्यवसायानिमित्त नगरमध्ये केरळचे अनेक रहिवासी स्थायिक झाले आहेत. या नागरिकांनी सावेडीच्या कुष्ठधाम रस्त्यावरील किंग कॉर्नरजवळ अयप्पा स्वामींचे मंदिर बांधले आहे. केरळमधील शबरीमला येथील अयप्पा मंदिरातील धार्मिक उत्सवांसारखे उत्सव नगरमध्ये देखील साजरी करण्यात येतात. गणपती हवन अय्यप्पा स्वामींना मानणारा मोठा वर्ग नगरमध्ये आहे. उद्योजक के के शेट्टी व विनया शेट्टी हे दांपत्य नगरमध्ये गेली 37 वर्षापासून मंडला महापूजा उत्सव करतात. गेली 2 वर्षे कोविडमुळे मंदिरात मोठे कार्यक्रम झाले नव्हते. त्यामुळे यंदा होत असलेल्या कार्यक्रमात मोठा उत्साह संचारला आहे. उत्सवानिमित्त पहाटे महागणपती हवन संपन्न झाले. राज्यातील ऐतिहासिक स्मारकांचा दुर्मीळ खजिना, मोफत छायाचित्र पाहण्याची सुवर्णसंधी मंदिरात सजावट दुपारी महिला व पुरुष भाविकांनी मंदिर परिसर फुलांनी सजविला, संध्याकाळी प्रोफेसर कॉलनी जवळील महालक्ष्मी मंदिर ते अय्यप्पा मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान महिलांनी मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली ताट व त्यामध्ये अर्धा नारळात दिवा प्रज्वलित केला होता. कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसर फुलांनी व दिव्यांनी उजळून निघाला होता. राज्यातील ऐतिहासिक स्मारकांचा दुर्मीळ खजिना, मोफत छायाचित्र पाहण्याची सुवर्णसंधी महाप्रसादाचे आयोजन अय्यप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या या दोन महिन्याचा उत्सवात रोज पूजा व महाप्रसाद असतो. संक्रांतीला मकर विल्लकू उत्सवाने उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष के के शेट्टी व अय्यप्पा सेवा समितीच्या पदाधिकारी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







