JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Nashik : जगातील एकमेव मंदिर, इथं महादेवासमोर नंदी नाही! वाचा काय आहे कारण

Nashik : जगातील एकमेव मंदिर, इथं महादेवासमोर नंदी नाही! वाचा काय आहे कारण

Nashik: महादेवाच्या मंदिरात नंदी हा असतोच. पण नाशिकमध्ये जगातील एकमेव असं मंदिर आहे की जिथं या मंदिरात नंदी नाही. काय आहे त्याचं कारण जाणून घ्या

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 1 सप्टेंबर :   नाशिक हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून जगभरात ओळखले जाते. अनेक ऐतिहासिक,पुरातन वास्तूंचा वारसा हा नाशिकला लाभला आहे.त्यामुळे जगाच्या नकाशावर नाशिकचं महत्व विशेष आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरात गोदावरी किनारी,रामकुंड परिसरात वसलेेल श्रीकपालेश्वर महादेव मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे.की या मंदिरात शंकर महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही.  जगभरातील प्रत्येक मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदीच स्थान आहे.700 वर्षांची परंपरा या मंदिराला आहे. या मंदिरात नंदी नसण्यामागे काही पुरातन संदर्भ आणि अख्यायिका सांगितल्या जातात. काय आहे अख्यायिका? पद्मपुराणात अशी कथा सांगितली जाते की,भगवान शंकरांना ब्रम्ह हत्येचं पातक झालं होत,ते त्रिखंडात फिरले,आणि त्याच प्रायश्चित त्यांना काही सापडेना,त्यावेळेस नंदीने भगवान शंकरांना सांगितलं की, नाशिकला अरुणा, वरूणा गोदावरी संगम आहे.तिथं आपण स्नान केल तर तुमचं ब्रह्म हत्येचं पातक नष्ट होईल. नंदीच्या सांगण्यावरून भगवान शंकरानी नाशिकमधील या संगमावर स्नान केले. त्यानंतर त्यांचं ब्रह्म हत्येचं पातक नष्ट झाले, त्यामुळे एक आदर म्हणून भगवान शंकरांनी नंदीना सांगितल तुम्ही इथं माझ्या समोर नसावं, अन्यथा तुम्ही कायम माझ्या सोबत असतात. नंदींनी भगवान शंकराची ही विनंती मान्य केली. त्यामुळे इथे भगवान शंकरासमोर नंदी नाही.अशी अख्यायिका सांगितली जात असल्याची  माहिती डॉ नरेंद्र धारणे यांनी सांगितली. शेकडो भाविक इथ दर्शनासाठी येत असतात.श्रीकपालेश्वर यांचं अस ही महत्व सांगितल जात की,12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर जितकं पुण्य मिळत,तितक पुण्य श्रीकपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मिळते.मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्नमय आहे.मंदिर पुरातन असल्यामुळे पूर्णतः काळ्या पाषाणात मंदिराचे बांधकाम झाले आहे.दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाल्या सारखं वाटतं, असे शुभम निकम यांनी सांगितले. Nashik : ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत! पाहा Photos मंदिरात दर्शनाची वेळ श्रीकपालेश्वर महादेव मंदिर हे पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं असतं,जगभरातून भाविक इथं दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर अगदी गोदावरीच्या किनारी असल्यामुळे भाविकांचा ओघ जास्त असतो. मंदिरातील आरतीची वेळ पहाटे 5 वाजता मंदिर उघडल्यानंतर पुजा अभिषेक करून आरती होते.त्यानंतर सायंकाळी 7 वाजता आरती होते. आरतीसाठी भाविकांना प्रवेश दिला जातो. Shree Kapaleshwar Mahadev Mandir गुगल मॅपवरून साभार महादेवची आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्य सागरमंथन पै केलें । त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या