JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Kanya horoscope : तुमची कन्या रास असेल तर 18 ऑगस्टपर्यंत घ्या काळजी, त्यानंतर...

Kanya horoscope : तुमची कन्या रास असेल तर 18 ऑगस्टपर्यंत घ्या काळजी, त्यानंतर...

कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना कसा असेल? इथं पाहा ज्योतिषी काय सांगतायंत?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 जुलै: एखादा दिवस, महिना किंवा वर्ष संपून नव्याने सुरू होत असेल तर अनेकजण आपलं भविष्य पाहतात. आता ऑगस्ट 2023 महिना सुरू होत आहे. त्यामुळे आपसुकच हा महिना आपल्यासाठी कसा असेल याची उत्सुकता अनेकांना असेल. त्यात कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक चढउतार घेऊन येतोय. पुण्यातील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी कन्या राशीच्या लोकांचं भविष्य सांगितलं आहे. कन्या राशीचे लोक हुशार कन्या राशीं ही एक सामान्य रास आहे आणि या राशीचे लोक खूप हुशार असतात. तसेच ते विश्लेषण कौशल्य, तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्तेमध्ये चांगले असतात. कन्या राशीच्या लोकांना व्यवसायाचे अधिक ज्ञान असू शकते. त्यांची आवड त्यात खोलवर असते. या राशीचे लोक सहजपणे मल्टीटास्किंग करण्यास सक्षम असतात. ते कुठलंही कार्य करण्यास सहजपणे यशस्वी देखील होतात. ऑगस्टमध्ये कन्या राशीच्या लोकांचे राहू आणि केतू हे ग्रह आठव्या स्थानात आहेत. त्यामुळे या महिन्यात प्रेमप्रकरणात संमिश्र परिणाम मिळण्याची शक्यता आहे, असे ज्योतिषी सांगतात.

18 ऑगस्टपर्यंत खर्चाची शक्यता कन्या राशीच्या लोकांची ग्रह स्तिथी पाहिली तर बाराव्या स्थानात मंगळ आहे. 18 ऑगस्टपासून मंगळ हा कन्या राशीत भ्रमण करेल. त्यामुळे 18 ऑगस्टपर्यंत कन्या राशीच्या लोकांना खूप खर्च होण्याची शक्यता वाटते. शुक्र हा लाभ स्थानात वक्री असणार असून पूर्ण महिनाभर ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे एकूण ग्रह योगाचा विचार केला तर कन्या राशीच्या लोकांना 18 ऑगस्ट पर्यंत खूप खर्च होण्याची शक्यता वाटते. तसंच मंगळ बाराव्या स्थानात असल्यामुळे नको त्या नको ठिकाणी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे, असे मारटकर सांगतात. वादविवाद टाळा, आरोग्य सांभाळा कन्या राशीच्या लोकांनी वादीवाद टाळवेत. तसेच कोर्ट कचेरी पासून लांब राहावे. त्या बरोबर रवी सुद्धा 17 ऑगस्ट नंतर दुसऱ्या स्थानात येत आहे. त्यामुळे त्यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मंगळ लग्न स्थानातून भ्रमण करताना अष्टमात येईल. तेव्हा पोटाचे विकार, पाय दुखणे, छोटासा अपघात होण्याची शक्यता आहे. कारण गुरु आणि राहू अष्टमात असल्यामुळे या लोकांनी आरोग्याची विशेष काळजा घेणं महत्त्वाचं आहे, असंही मारटकर सांगतात. तुमची आहे मीन रास? ॲागस्ट महिना असेल स्पेशल, वाचा सविस्तर घर, प्रॉपर्टीचा लाभ होण्याची शक्यता कन्या राशीच्या लोकांसाठी समाधानाची गोष्ट म्हणजे शुक्र हा महिनाभर लाभ स्थानात वक्री करेल. यामुळे आर्थिक आवक चांगली राहील. घर, प्रॉपर्टी, जागा, वाहन यांचे लाभ होतील. या काळामध्ये पैशाचा ओघ चांगला राहील. चांगले नवीन मित्र मैत्रिणी भेटतील. विवाह इच्छुक व्यक्तीचे विवाह जमतील. पैपाहुण्यांची वर्दळ राहील. त्यांचा पाहुणचार करतील. त्याचप्रमाणे शुक्राचं भ्रमण हे लाभ स्थानातून आहे. नवीन वस्त्र अलंकार निश्चितपणे कन्या राशीच्या लोकांना मिळतील. मित्र मैत्रिणी यांच्याकडून चांगलं सहकार्य मिळेल, असं ज्योतिषी सांगतात. गणपतीची उपासना मंगळाची काळजी घेण्यासाठी गणपतीची उपासना या लोकांनी करावी. दुर्गा उपासना करावी. हनुमान चालीसा वाचावी. या पासून त्यांच्या आरोग्याला संरक्षण मिळेल. नोकरीनिमित्त प्रवास होऊ शकतो किंवा परदेश भ्रमण होऊ शकते, असा हा महिना संमिश्र फळाचा राहील, अशी माहिती ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या