मुंबई, 12 ऑगस्ट : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता असते. यंदा 18 ऑगस्ट 2022 रोजी भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणजेच श्री कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) साजरी केली जाईल. या विशेष प्रसंगी भाविक उपवास करतात. श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. यासोबतच श्रीकृष्णाला विविध प्रकारचा नैवेद्य अर्पण केला जातो. हिंदू मान्यतेनुसार, बाळकृष्णाला पंचामृताचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. बाळकृष्णाची पूजा पंचामृताशिवाय अपूर्ण राहते, असे म्हणतात. श्रीकृष्णाला पंचामृत अर्पण करण्यामागे अनेक धार्मिक नियम आहेत. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून पंचामृताचे महत्त्व जाणून घेऊया. पंचामृताचे महत्त्व - पंचामृत दोन शब्दांपासून बनले आहे. पंच + अमृत, म्हणजे ‘पाच’ आणि ‘अमृत’. पंचामृताला देवांचे पेय असेही म्हणतात. पंचामृत हे एक पवित्र पेय आहे, जे दूध, दही, तूप, मध, साखर या घटकांपासून तयार केले जाते. मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून पंचामृत अर्पण केले जाते. पंचामृत प्रथम देवतांना अर्पण केले जाते आणि नंतर प्रसादाच्या रूपात भक्तांमध्ये वाटले जाते. दूध हे शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तूप शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे, मध हे समर्पण आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे. साखरेचा गोडवा आणि दही हे समृद्धीचे प्रतीक आहे. हे वाचा - Locket Tips : लॉकेटचे असे तोटे पण असतात; गळ्यात घालताना हे नियम एकदा समजून घ्या बाळकृष्णाचे आवडते पेय - हिंदू मान्यतेनुसार, बासुरी, गाय, लोणी यासह भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे प्रिय आहेत. भगवान श्रीकृष्णाला पंचामृत अर्पण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे, म्हणून श्रीकृष्णाच्या जयंती म्हणजेच जन्माष्टमीला श्रीकृष्णाला पंचामृत अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. हे वाचा - महादेवाच्या अश्रूंपासून अशी झाली रुद्राक्षाची उत्पत्ती; धारण करण्याचे नियम समजून घ्या पंचामृताला चरणामृत असेही म्हणतात. शास्त्रानुसार, पंचामृत रोग प्रतिकारशक्ती वाढवते, मेंदूला तीक्ष्ण करते आणि पित्त दोष संतुलित करते, असेही मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)