महादेवाच्या अश्रूंपासून अशी झाली रुद्राक्षाची उत्पत्ती; धारण करण्याचे नियम समजून घ्या

महादेवाच्या अश्रूंपासून अशी झाली रुद्राक्षाची उत्पत्ती; धारण करण्याचे नियम समजून घ्या

रुद्राक्षाची जपमाळ धारण केल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आराम मिळतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. यासोबतच घरात सुख-शांती नांदते. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : हिंदू धर्मात रुद्राक्षाला खूप महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाल्याचे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. हिंदू धर्मावर श्रद्धा असलेले अनेक लोक रुद्राक्षाची पूजा करतात. असे मानले जाते की, रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. रुद्राक्षाची जपमाळ धारण केल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आराम मिळतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. यासोबतच घरात सुख-शांती नांदते. इतकेच नाही तर रुद्राक्ष धारण करणार्‍या व्यक्तीच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा रुद्राक्ष (Rudraksh Dharan Niyam) धारण करण्याचे नियम सांगत आहेत.

रुद्राक्षाची उत्पत्ती -

हिंदू पौराणिक मान्यतेनुसार, रुद्राक्षाच्या उत्पत्तीबद्दल असे सांगितले जाते की, एकदा भगवान शिव 100 वर्षे ध्यानात होते आणि जेव्हा भगवान शिव काही कारणांमुळे त्यांच्या ध्यानातून जागे झाले तेव्हा त्यांनी अनेक दिवस डोळे बंद ठेवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. भगवान शंकराच्या या अश्रूंपासून रुद्राक्ष वृक्षाची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. या कारणास्तव हिंदू धर्मात रुद्राक्षाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे.

रुद्राक्ष धारण करण्याचे नियम -

ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की, आपण आपल्या मनगटावर, मानेवर आणि हृदयावर रुद्राक्ष धारण करू शकतो. याशिवाय गळ्यात रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

जर कोणाला मनगटावर रुद्राक्ष धारण करायचा असेल तर मनगटावर 12 रुद्राक्ष धारण करू शकता. याशिवाय गळ्यात 36 रुद्राक्ष आणि हृदयावर 108 रुद्राक्षांची जपमाळ करून ती धारण करावी.

रुद्राक्षाचा थेट भगवान शिवाशी संबंध आहे, म्हणून ते धारण करण्यापूर्वी सात्विक असणे आणि शुद्ध आचरण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते भगवान शंकराला अर्पण करावे.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

रुद्राक्ष धारण करण्यासाठी श्रावण हा पवित्र महिना मानला जातो. याशिवाय आपण शिवरात्रीलाही रुद्राक्ष धारण करू शकतो किंवा कोणत्याही महिन्याच्या सोमवारीही धारण करू शकता.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 7, 2022, 6:00 AM IST

ताज्या बातम्या