JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / हनुमान जयंती आली जवळ, शुभ मुहूर्तावर करा बजरंगबलीची पूजा, कुटुंबाची होईल प्रगती

हनुमान जयंती आली जवळ, शुभ मुहूर्तावर करा बजरंगबलीची पूजा, कुटुंबाची होईल प्रगती

hanuman jayanti 2023 date: हनुमान जयंती केव्हा आहे आणि पूजेचा शुभ काळ कोणता? इत्यादींविषयी काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊ.

जाहिरात

हनुमान जयंती 2023

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 एप्रिल : रामभक्त हनुमानाची जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार हनुमान हा रुद्रावतार आहे. मंगळवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वानरराज केसरी आणि आईचे नाव अंजली. रामाची सेवा करण्यासाठी हनुमानाचा जन्म झाला. सीता मातेला शोधण्यात आणि लंका जिंकण्यात हनुमानाने श्रीरामाला मदत केली. हनुमान जयंती केव्हा आहे आणि पूजेचा शुभ काळ कोणता? इत्यादींविषयी काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊ. हनुमान जयंती 2023 - हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी चैत्र पौर्णिमा तिथी बुधवार, 05 एप्रिल रोजी सकाळी 09:19 वाजता सुरू होईल आणि 06 एप्रिल गुरूवारी सकाळी 10:04 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत गुरुवारी, 06 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी उपवास करून बजरंगबलीची पूजा केली जाईल. हनुमान जयंती 2023 पूजा मुहूर्त - 06 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पूजा करू शकता. सकाळी 06:06 पासून शुभ मुहूर्त तयार होत आहे, जो सकाळी 07:40 पर्यंत आहे. त्यानंतर दुपारी 12:24 ते दुपारी 01:58 पर्यंत लाभ आणि प्रगतीचा मुहूर्त आहे. ज्यांना हनुमान जयंतीची पूजा संध्याकाळी करायची आहे, ते संध्याकाळी 05.07 ते 08.07 पर्यंत करू शकतात. हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:07 ते 06:42 पर्यंत आहे. संध्याकाळी 06.42 ते 08.07 पर्यंत अमृत हा सर्वोत्तम मुहूर्त आहे. हनुमान जयंती 2023 शुभ मुहूर्त - हनुमान जयंतीच्या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11.59 ते दुपारी 12.49 पर्यंत असेल. हा त्या दिवसाचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी हस्त आणि चित्रा नक्षत्रात हनुमान जयंती साजरी केली जाईल.

हनुमान जयंती पूजा - 06 एप्रिल रोजी हनुमान जयंतीची शुभ मुहूर्तावर पूजा करा किंवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळेत पूजा करू शकता. हनुमानाला त्या दिवशी लाल फुले, सिंदूर, अक्षत, सुपारी, मोतीचूर लाडू, लाल लंगोट इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे. नंतर हनुमान चालीस पाठ करा. हनुमान मंत्राचा जपही लाभदायक ठरेल. त्यानंतर हनुमानाची आरती करावी. बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमचे संपूर्ण कुटुंब प्रगती करेल. संकटे संपतील आणि दोष दूर होतील. हे वाचा -  रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या