डोंबिवली, 29 जून : आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन करतात. त्यानंतर ते कार्तिक शुद्ध एकादशीला उठतात. त्यांच्या विश्रांतीचा कालावधी चार महिने असतो. देव झोपल्यानंतर कोणतेही शुभ कार्य करायची नाहीत . यामुळे लग्न सोहळ्यात देखील देव गैरहजर राहतात असा एक समज आहे. पण, आता ही परिस्थिती बदलली आहे. आता चातुर्मासातही लग्न होतात. ही लग्न होण्याची काय कारणं आहेत? याचा माहिती डोंबिवलीतील गुरूजी सचिन ठाकूर देसाई यांनी दिली. काय आहे कारण? चातुर्मासात काही गौण मुहूर्त आहेत. त्याला काढीव मुहूर्त असेही म्हंटले जाते. अनेकजण परदेशात असतात. त्यांना नेहमी देशात यायाला मिळत नाही. त्यामुळे अशा विवाह इच्छुकांसाठी हे मुहूर्त काढले जातात. धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील अधिकारी व्यक्तींनी चर्चा करून या गौण मुहूर्ताची निर्मिती केलीय, असं ठाकूर-देसाई गुरुजींनी दिली.
कोणते आहेत मुहूर्त? 6 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत शुक्र लोप असल्याने मुहूर्त नाहीत. काही कारणांमुळे या कालावधीमध्येही लग्न करायचं असेल तर 22 ,26,28, 29 ऑगस्ट रोजी करू शकता. सप्टेंबर महिन्यात 3,6,7,8,17,24 या दिवशी लग्नाचा मुहूर्त आहे. ऑक्टोबरमध्ये 16,20,22,23 तर नोव्हेंबर महिन्यात 1, 6, 18, 20 आणि 22 तारीख लग्नासाठी शुभ आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘या’ राशींच्या व्यक्तींनी करा दान, होईल भरभराट काय आहे कृषी परंपरा? शेतीतील पेरण्या ज्येष्ठ महिन्यात होतात, आषाढमध्ये देव शयनात जातात,अशी धारणा आहे. आश्विन महिन्यात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते अशी कृषी परंपरा सांगितली जाते. शेतीच्या कामात शेतकरी व्यग्र असल्याने पूर्वी लग्न करत नसत. आता विवाह इच्छुक या कालावधीमध्येही चातुर्मासातील गौण कालवधीत लग्न करू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)