JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ganpati Decoration Ideas : बाप्पाच्या स्वागतासाठी 2 दिवसात करता येईल, या सोप्या मखराच्या आयडिया

Ganpati Decoration Ideas : बाप्पाच्या स्वागतासाठी 2 दिवसात करता येईल, या सोप्या मखराच्या आयडिया

बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला आता अवघे काही दिवसाचं उरले आहेत. तेव्हा सर्वांची घाई गडबड होणे रास्त आहे. पण आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या मखराच्या आयडिया घेऊन आलो आहोत.

जाहिरात

गणपती मखर डेकोरेशन आयडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : यंदाचा गणेश चतुर्थी उत्सव 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. 10 दिवस बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला आता अवघे काही दिवसाचं उरले आहेत. तेव्हा सर्वांची घाई गडबड होणे रास्त आहे. पण आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या मखराच्या आयडिया घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही घरच्या घरी आणि खूप कमी वेळात गणपती बाप्पाचा मखर अगदी उत्तम प्रकारे सजवू शकता. बाप्पाचा मखर बनवण्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी कागदी पिनव्हील्स वापरू शकता. यासाठी कागदी पिनव्हील बाजारातून आणा किंवा घरी बनवून मूर्ती स्थापनेच्या मागील बाजूस भिंतीवर चिकटवता येते. (Image- Instagram/wedinspiro)

(Image- Instagram/wedinspiro)

गणेश पूजेची जागा सजवण्यासाठी तुम्ही ओढणी किंवा साडी वापरू शकता. तुमच्या आवडत्या रंगाची ओढणी स्कर्टप्रमाणे भिंतीवर चिकटवा. यासोबत झेंडूच्या फुलांचे हारही तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता. (Image- Instagram/festivedecoration.mumba)

(Image- Instagram/festivedecoration.mumba)

अशा प्रकारे फुलं, तार आणि घागरा टाकून तुम्ही भव्य पँडल बनवू शकता. (Image-Instagram/chunks.of.heaven_)

(Image-Instagram/chunks.of.heaven_)

थर्मोकोल आणि प्लास्टिक या पर्यावरणाला घातक गोष्टींऐवजी कागदापासून किंवा रद्दीपासूनसुद्धा सुंदर सजावट करता येते. कागद, काड्या, पेपर कप अशा साहित्यापासून इको फ्रेंडली गणपती डेकोरेशनच्या आयडिया इथे दिसतील. कात्री, कागद, डिंक आणि पुठ्ठा अशा साध्या मोजक्या गोष्टींतून हे इको फ्रेंडली डेकोरेशन करता येईल. https://www.youtube.com/watch?v=Z9agLGHEOeY&t=2s साध्या संगीत कागदापासून घड्या घालून फुलं करा आणि त्यातून सुंदर सजावट कशी करायची याचे पर्याय पुणेकर स्नेहा या YouTube चॅनेलवर दिसतील. ओरिगामी https://www.youtube.com/watch?v=75RzgVMaYns मातीचे गडकिल्लेही तयार करता येतात. त्यासाठी घरतल्याच जुन्या चटया, बारदान, खोके, टोपल्या आणि माती वापरावी आणि एखादा गड तयार करावा. मावळे, छोटे प्राणी वापरून सजावट करावी. युट्युबवर JAY NACHANKAR या नावाने असलेल्या चॅनलवरील ही आयडिया तुम्ही वापरू शकता. https://www.youtube.com/watch?v=2crrSIHzd_g

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या