JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ganesh Visarjan : 10व्या दिवशीच का केले जाते गणपतीचे विसर्जन? महाभारताशी निगडित आहे कारण, वाचा माहिती

Ganesh Visarjan : 10व्या दिवशीच का केले जाते गणपतीचे विसर्जन? महाभारताशी निगडित आहे कारण, वाचा माहिती

हिंदू मान्यतेनुसार, श्री गणेशाचा जन्म मध्ययुगीन काळात झाला होता. त्यामुळे त्यांचीही स्थापना यावेळी झाली पाहिजे. विसर्जनाच्या दिवशीही गणपतीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 सप्टेंबर : आता जवळजवळ सर्वांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेश चतुर्थीला सर्वजण गणपतीचे यथोचितच पूजन करून त्यांना आपल्या घरात विराजमान करतात. हिंदू मान्यतेनुसार, श्री गणेशाचा जन्म मध्ययुगीन काळात झाला होता. त्यामुळे त्यांचीही स्थापना यावेळी झाली पाहिजे. विसर्जनाच्या दिवशीही गणपतीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु तुम्हाला गणपती विसर्जनामागील कथा माहित आहे का? बाप्पाच्या विसर्जनाचे कारण महाभारताशी निगडित आहे. ‘विसर्जन’ म्हणजे काय? ‘विसर्जन’ हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘पाण्यात विरघळणे’ असा होतो. ही एक आदरणीय प्रक्रिया आहे, त्यामुळे घरी पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या मूर्तींचे पाण्यात विसर्जन करून त्यांना आदर दिला जातो. साधारणपणे सर्वत्र गणपतींचे विसर्जन 10 व्या दिवशी केले जाते. मात्र काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपतीदेखील बसवला जातो.

Ganesh Chaturthi 2022: उंदीर गणपतीचे वाहन कसा बनला? अशी आहे त्यामागची रंजक कथा

गणपती विसर्जनामागील कारण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. यासोबतच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. झी न्यूज हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, महर्षी वेद व्यासांनी गणेशजींना महाभारताच्या रचनेसाठी लिहिण्याची विनंती केली होती. त्यावर गणेशजींनी लिहायला सुरुवात केली तर लेखणी थांबणार नाही असे सांगितले होते. जर लेखणी थांबली तर मी तिथेच लिहिणे बंद करेल असेही सांगतले.

Ganesh Chaturthi 2022: गणपतीने घेतले होते हे प्रमुख अवतार; प्रत्येक नावाला आहे विशेष महत्त्व

संबंधित बातम्या

तेव्हा महर्षी वेदव्यास म्हणाले की, देवा तुम्ही विद्वानांमध्ये अग्रभागी आहात आणि मी एक साधा ऋषी आहे, माझ्या श्लोकांमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करून लिहून ठेवावी. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि ते सलग 10 दिवस चालले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महाभारत लिहिण्याचे काम पूर्ण झाले तेव्हा गणेशजींचे शरीर स्थिर झाले होते. अजिबात हालचाल न केल्यामुळे त्याच्या अंगावर धूळ आणि माती साचली होती. त्यानंतर गणेशाने सरस्वती नदीत स्नान करून शरीर शुद्ध केले. त्यामुळे 10 दिवस गणपतीची स्थापना करून नंतर गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या