भारतात ईद कधी साजरी होणार
मुंबई, 21 एप्रिल : ईदचा उत्सव मुस्लिम समाजात खूप लोकप्रिय मानला जातो. ईद अल-फितरची तयारी जोरात सुरू आहे. ईदचा उत्सव रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो. रमजानचा पवित्र महिना 24 मार्चपासून सुरू झाला. त्यानंतर 29 ते 30 दिवस रोजा ठेवल्यानंतर चंद्र पाहिल्यावर ईद साजरी केली जाते. जगभरातील मुस्लिम देशांमध्ये ईद वेगवेगळ्या तारखांना साजरी केली जात आहे, कारण ईद साजरी करणं चंद्र दर्शनावर अवलंबून आहे. त्याला चंद्ररात्र (चांद की रात) म्हटले जाते. ज्या दिवशी चंद्र दिसतो, त्या दिवशी दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. ईदचा चंद्र सौदी अरेबियामध्ये दिसला आहे, त्यामुळे तिकडे आज ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे भारतातही आज चंद्र दिसू शकतो. आज संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतारमध्ये ईद साजरी केली जात आहे. तर ओमानने शनिवारी ईद साजरी करण्याची घोषणा केली आहे. ईद-उल-फितर भारतात कधी? ईदचा उत्सव इस्लामिक कॅलेंडरच्या दहाव्या शव्वालची पहिली तारीख आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दर्शनाने साजरा केला जातो. अशा परिस्थितीत, जर चंद्र आज भारतात दिसला तर 22 एप्रिल रोजी ईदचा उत्सव साजरा केला जाऊ शकतो आणि तसे न झाल्यास एक दिवसानंतर ईदचा उत्सव 23 एप्रिल रोजी साजरा केला जाऊ शकतो. हे वाचा - या राशींची जोडी राशीचक्रात सर्वात शक्तिशाली, तुमच्या जोडीदाराची वैशिष्ट्ये चंद्र रात्री (चांद रात) म्हणजे काय? जेव्हा रात्री चंद्र दिसतो, तेव्हा सकाळी ईद-उल-फितरचा उत्सव साजरा केला जातो. चंद्राच्या दिसण्याला चंद्र रात्र, असे म्हणतात. यासह रमजानचे रोजे-उपवास संपतो. यामुळे, ईद-उल-फितर रोजे संपण्याचा कार्यक्रम असे म्हटले जाते. हे वाचा - लक्ष्मी कृपेचा वर्षाव! अक्षय्य तृतीयेला राशीनुसार सोने किंवा हे धातू खरेदी करा ईदच्या नमाजापूर्वी जकात देणे का आवश्यक? मुस्लिम समाजात असे मानले जाते की, ईदच्या नमाजापूर्वी जकात आणि फित्रा हे खूप महत्वाचे असतात. कारण ते एखाद्या कर्तव्यासारखं आहे. एका वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या नकद आणि सोन्याच्या दागिन्यांच्या एकूण मूल्याच्या 2.5 टक्के जकात काढला जातो. तो गरीब किंवा गरजूंना दान करण्याची परंपरा आहे.