रमजान ईद 2023
नवी दिल्ली, 22 एप्रिल : दिल्लीसह देशातील अनेक भागात शुक्रवारी संध्याकाळी ईद-उल-फित्रचा चंद्र दिसला आणि आज देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शुक्रवारीच सर्व उलेमांनी यासंदर्भात घोषणा केली होती. दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनी पीटीआयला सांगितले की, “शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली-एनसीआर, हरियाणा, बिहार, राजस्थान आणि आसामच्या अनेक शहरांसह अनेक ठिकाणी ईदचा चंद्र सर्वांना दिसला. शुक्रवारी शव्वालचा वर्धमान चंद्र दिसला, त्यामुळे आज देशभरात ईद साजरी केली जात आहे. हा चंद्र रमजान उपवास समाप्तीचा चंद्र मानला जातो. पंतप्रधान मोदींनी ईद उल फित्रच्या दिल्या शुभेच्छा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मोदींनी या प्रसंगी जगभरातील लोकांना शांती, सौहार्द, आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. हसीना यांना दिलेल्या संदेशात पीएम मोदी म्हणाले की, “भारतीय जनतेच्या वतीने मी तुम्हाला आणि बांगलादेशातील नागरिकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देतो.” पंतप्रधान मोदी म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्यात जगभरातील मुस्लिम लोक रोजे आणि उपवास करतात. नमाज अदा करूया आणि ईद उल फित्रच्या या विशेष प्रसंगी मुस्लिम समाजातील लोकांसह जगभरातील लोक एकता आणि बंधुतेच्या मूल्यांची जाणीव करून देत आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी दिल्या शुभेच्छा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला लोकांना शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी समाजात बंधुता आणि सद्भावना वाढविण्यासाठी प्रत्येकाने शपथ घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “ईद रमजानचा पवित्र महिना पूर्ण झाल्याचे प्रतिक आहे. हा सण प्रेम, करुणा आणि आपुलकीच्या भावनांचा प्रसार करतो. ईद आपल्याला एकात्मतेचा आणि परस्पर सौहार्दाचा संदेश देतो.’’ मुर्मू म्हणाल्या, ‘‘हा सण सौहार्दाच्या भावनेने ओतप्रोत आहे आणि आपल्याला शांततापूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्याची प्रेरणा देतो.’’ त्या म्हणाल्या, ‘‘या सणाच्या निमित्तानं प्रतिज्ञा घ्या. समाजात बंधुता आणि सौहार्दाची भावना वाढवणे, आपलं कर्तव्य आहे.
देशभरात दिसला ईदचा चंद्र - शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद म्हणाले, “लिहाजा शव्वाल महिन्याचा पहिला दिवस (इस्लामिक कॅलेंडरचे 10) शनिवारी आहे. शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी ईदचा सण साजरा केला जातो. त्याचवेळी त्यांनी पीटीआयला सांगितले की, मशिदीच्या रुएत-ए-हिलाल समितीने अनेक ठिकाणी संपर्क साधला आणि त्यांना सर्वत्र चंद्र दिसत असल्याचे सांगण्यात आले. ते म्हणाले की, शनिवारी देशात ईद साजरी होणार आहे. अहमद म्हणाले की, रुयत-ए-हिलाल कमिटी, आधार-ए-शरिया-हिंदची बैठक झाली आणि दिल्ली आणि देशाच्या इतर भागात चंद्र दिसल्याचे सांगण्यात आले. हे वाचा - भारतात ईद कधी साजरी होणार? सऊदी अरेबिया, ओमानमध्ये झालं चंद्रदर्शन आज ईदची नमाज अदा आज देशातील सर्व मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येईल. अहमद म्हणाले की, मौलाना नजीबुल्ला कासमी, रुयत-ए-हिलाल कमिटी, अदान-ए-शरिया-हिंद यांनी जाहीर केले आहे की शव्वाल महिना शनिवार, 22 एप्रिल 2023 पासून सुरू होईल आणि शनिवारी ईदची नमाज अदा केली जाईल. ईद हा बंधुभाव आणि सौहार्दाचा सण असल्याचे वर्णन करताना अहमद म्हणाले, “यानिमित्ताने आम्ही प्रार्थना करतो की देशात 75 वर्षांपासून प्रस्थापित झालेला बंधुभाव आणि सद्भभाव कायम राहो. रमजानची शेवटची नमाज - शुक्रवारी श्रीनगरमधील ऐतिहासिक जामिया मशिदीसह संपूर्ण काश्मीरमध्ये धार्मिक उत्साहात ‘जुम्मा-तुल-विदा’ नमाज अदा करण्यात आली. ईदचा चंद्र दर्शनानंतर शुक्रवारी पवित्र रमजान महिना संपला. यावेळी रमजान महिना 29 दिवसांचा होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत हा पवित्र महिना 30-30 दिवसांचा होता. इस्लामिक कॅलेंडरनुसार, चंद्राच्या दर्शनावर अवलंबून एका महिन्यात 29 किंवा 30 दिवस असतात. हे वाचा - पंचग्रही योग जुळलाय तोही अक्षय्य तृतियेला! या 4 राशींना मिळणार नशिबाची दमदार साथ शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी ईद साजरी केली जाते - लखनौचे मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी चंद्र दिसला आणि शनिवारी ईद-उल-फित्र साजरी केली जाईल. रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, शेकडो लोक जुन्या दिल्लीतील जामा मशिदीत नमाज अदा करताना दिसले. रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी ईद-उल-फितर, जगभरात वेगवेगळ्या तारखांना साजरी केली जाते, जी चंद्रकोर चंद्र दिसण्यावर अवलंबून असते.