JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Dasara 2022 : सोलापूरच्या देवीचे पाकिस्तान कनेक्शन, आजही जपलाय ठेवा! Video

Dasara 2022 : सोलापूरच्या देवीचे पाकिस्तान कनेक्शन, आजही जपलाय ठेवा! Video

Solapur: सोलापूरचे हिंगुलांबिका मंदिराचे पाकिस्तानशी कनेक्शन आहे. आजही या मंदिरात तो ठेवा जपून ठेवण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 5 ऑक्टोबर : नवरात्र म्हणजे देवीच्या जागराचा उत्सव. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गामातेचे वेगवेगळ्या रूपाचे स्मरण केले जाते. देवीच्या उपासनेनंतर आपल्यावरील सर्व संकटांचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रीमधील नऊ दिवस चालेल्या या उत्सवाची सांगता विजयादशमीच्या दिवशी होते. विजयादशमी हा सत्याचा असत्यावरील विजय साजरा करण्याचा दिवस. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आजच्या दिवशी राज्यभरातील भाविक देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या दर्शनानं त्यांच्या नवरात्र उत्सवाची सांगता होते. राज्यातील काही देवीची मंदिरं ही प्राचीन आहेत. या प्राचीन मंदिरांमध्ये सोलापूरचे हिंगुलांबिका देवीच्या मंदिराचा समावेश होते. सव्वाशे वर्ष जुन्या असलेल्या या मंदिराचे पाकिस्तानशीही कनेक्शन आहे. काय आहे पाकिस्तान कनेक्शन? भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी होण्यापूर्वी तत्कालीन सोलापूरातील बासुतकर,पेंडकर,महिंद्रकर,तांदळे,बुलबुले मंडळींनी पाकिस्तान जाऊन या मूळ मुर्तीच्या शिला सोलापूरात आणल्या होत्या. सध्याच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये या मातेचे मूळ मंदिर आहे. बलुचिस्तानमधील मंदिराच्या शिळा सोलापूरात आणून त्यांनी मंदिराची उभारणी केली. बलुचिस्तानमधील हिंगलाजमाता या देवीच्या नावावरून या मंदिराला हिंगुलांबिका हे नाव त्यांनी दिले. सध्याच्या जुन्या सोलापूरमधील गणेश पेठ भागात हे मंदिर आहे. या मंदिरासंदर्भातील पुरातन लेख इथं आजही जतन करुन ठेवण्यात आले आहेत. घरासाठी घेतलेल्या जागेवर का उभे राहिले सारसबागेचे महालक्ष्मी मंदिर? Video मंदिरातील जुने पुजारी श्रीकांत बासुतकर यांनी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील हिंगलाजमाता या मूळ देवीचे दर्शन घेतले. त्यांनी येथील मंदिरातून आणलेल्या नारळाचे आजही मोठ्या भक्तीभावानं मंदि्रात पूजन होते. त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये जवळपास सर्व देवी देवतांच्या पूजा या सोडोपचार पूजा पद्धतीनं होतात. महाराष्ट्रात फक्त हिंगुलांबिका या सोलापुरातील देवीची पूजा या प्रकारे केली जाते. काय आहे सोडोपचार पूजा? या पूजा प्रकारात देवीची सोळा प्रकारे पूजा केली जाते. त्या सोळा प्रकारच्या पूजनामध्ये दूध, तूप दही मध तसेच देवीला चंदनाची, हळदी कुंकवाची अंघोळ घातली जाते. वेदमंत्रातील उच्चाराने देवीला प्रत्येक नऊ दिवसाचा साज केला जातो. तसेच घरातील आईला किंवा मुलीला ज्या प्रकारे शृंगार केला जातो त्याच प्रकारे देवीला नटवले जाते. हिंगुलांबिका ही देवी म्हणजे चक्क हिंदू-मुस्लिम एकाच मूर्तीमंत उदाहरण आहे. कराची जवळ लासबेला येथे उतरून भाविक बलुचिस्तानतील या देवीला जातात. सुमारे अडीचशे किलोमीटरचा हा प्रवास आहे. त्यावेळी देवीची पालखी सुद्धा नेली जाते. वृद्धांना दर्शन घडवण्यासाठी सरसावले दूत, औरंगाबादच्या तरूणाईचा खास उपक्रम Video

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

मंदिराचा पत्ता हिंगुलांबिका माता मंदिर , गणेश पेठ , सोलापूर. मंदिराची वेळ : सकाळी 6 ते रात्री 8

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या