चाणक्य नीति टिप्स
मुंबई, 04 मार्च : महान मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे धोरणात्मक विचार जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या नीति ग्रथांत अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने जीवनातील कोणत्याही अडचणीवर मात करता येते. त्यांचे नैतिक विचार एखाद्याचे जीवन बदलू शकतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात जीवनातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती आहे, याविषयीही सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी काळ म्हणजेच वेळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट असल्याचे वर्णन केले आहे. त्यांनी सांगितलंय की, काळ ही अशी गोष्ट आहे जी या सृष्टीलाही नष्ट करते. प्रत्येकाचा काळ हा ज्याच्या त्याच्या हातात असतो. काळ हा इतका शक्तिशाली आहे की, कोणीही त्याला मागे टाकू शकत नाही. त्याला कोणीही हरवू शकत नाही. याविषयी ते त्यांच्या श्लोकात म्हणतात- कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः. कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः॥ वेळ गेली की गेली - आचार्य चाणक्य म्हणतात की, काळाच्या पुढे कोणीही धावू शकत नाही. जेव्हा कोणाची वेळ येते तेव्हा त्याला कोणी रोखू शकत नाही. वेळ ही चांगली आणि वाईटही असू शकते. चांगली वेळ आली तर माणूस जगज्जेताही होऊ शकतो आणि वाईट वेळ आली तर भिकारीही होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे हातात असलेल्या वेळेचा जीवनात जास्तीत-जास्त सदुपयोग करून घेतला पाहिजे. वेळेला किंमत न देणाऱ्याचं आयुष्य मातीमोल होऊन जातं. एकदा गेलेली वेळ काही केल्या परत येत नाही. त्यामुळे वेळेचे भान राखा, कोणतीही गोष्ट नियोजनबद्ध जणू वेळापत्रक लावून करायला हवी. हे वाचा - पूजेवेळी म्हणावे लक्ष्मी मातेचे हे 5 अचूक मंत्र; मान-सम्मान, धन-धान्य सगळं मिळतं म्हणून प्रत्येकाशी विनम्र वागा - आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा एखाद्याची वेळ येते तेव्हा त्याला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे नेहमी सर्वांसोबत प्रेमाने रहा. प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. हीच गोष्ट तुमच्या मृत्यूनंतरही तुमच्यासोबत येते. हे वाचा - साधू-संन्यासी भगव्या, पांढऱ्या, काळ्या रंगाचेच कपडे का घालतात? रंगांचा अर्थ काय वेळेची किंमत समजते त्याच्यावर लक्ष्मीची होते कृपा - आचार्य चाणक्य म्हणतात की ज्यांना वेळेची किंमत समजते त्यांच्यावर लक्ष्मी नेहमीच कृपा करते. प्रत्येक काम वेळेवर करा. आजचे काम उद्यासाठी पुढे ढकलू नका. पूर्ण मेहनत आणि समर्पणाने आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. जे हे करतात, त्यांना वेळही साथ देते.