बुद्ध पौर्णिमेला घरी आणण्याच्या वस्तू
मुंबई, 04 मे : हिंदू धार्मिक पुराणानुसार, वैशाख पौर्णिमेला दान आणि धार्मिक कार्य केल्यानं विशेष लाभ होतो. यावर्षी वैशाख पौर्णिमा शुक्रवार, 5 मे 2023 रोजी येत आहे. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी महात्मा बुद्ध म्हणून आपला नवीन अवतार घेतला. बौद्ध धर्माचे अनुयायी हा दिवस सण म्हणून साजरा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही खास गोष्टी घरात आणणे खूप शुभ असते. ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सुखी जीवनासाठी, प्रगतीसाठी घरात कोणत्या वस्तू आणाव्यात, याविषयी दिलेली माहिती पाहुया. - पितळी हत्ती बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पितळेचा हत्ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पितळेचा हत्ती घरी आणल्यास घरातील दारिद्र्य दूर होते आणि कुटुंबात सुख-शांतीसोबतच ऐश्वर्य-समृद्धी नांदते, असे मानले जाते.
- बुद्ध मूर्ती भगवान महात्मा बुद्धांचा जन्म बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. म्हणूनच या दिवशी भगवान बुद्धांची मूर्ती घरी आणणे देखील खूप शुभ आहे. फेंगशुईनुसार, महात्मा गौतम बुद्धांची मूर्ती शुभ ठरते आणि नशीब बदलते. म्हणूनच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाची मूर्ती घरात आणावी. - चांदीचे नाणे दिवाळीप्रमाणेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरात आणणे खूप शुभ असते. विशेषतः चांदीचे नाणे तुमचे नशीब बदलू शकते. मान्यतेनुसार, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे घरी आणल्याने लक्ष्मी आणि श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. शनीच्या ग्रहस्थितीमुळं दुर्मिळ शश महापुरुष योग; या 5 राशीच्या लोकांसाठी वरदान - श्रीयंत्र हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीचा निवास श्रीयंत्रामध्ये आहे, असे मानले जाते. म्हणूनच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणावे. वैशाख पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर श्री यंत्र घरी आणल्याने घराची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि घरातील लोकांची प्रगती होते, असे मानले जाते. - कवड्या हिंदू धर्मीय मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत. त्यामुळे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कवड्या घरी आणल्यानं देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)