JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / बागेश्वर बाबा अखेर नरमले; साईबाबांवरील वक्तव्यानंतर म्हणाले, 'आम्ही छत्री मागे ठेवली तर...'

बागेश्वर बाबा अखेर नरमले; साईबाबांवरील वक्तव्यानंतर म्हणाले, 'आम्ही छत्री मागे ठेवली तर...'

Dhirendra Krishna Shastri News: धीरेंद्र शास्त्री म्हणाले, ‘संतांना गुरू मानत असेल, तर ती त्याची वैयक्तिक श्रद्धा आहे. यात आमचा कोणताही आक्षेप नाही. माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मला माफ करा.

जाहिरात

बागेश्वर बाबा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छतरपूर, 5 एप्रिल : बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्‍वर महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या वक्तव्यावरुन वारंवार चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त माहिती सांगितली होती. तर नुकतेच शिर्डीचे साई बाबा यांच्यावरही त्यांनी असच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर देशभरातून साईभक्तींनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की साईबाबा संत असू शकतात पण त्यांना देव म्हणता येणार नाही. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यावरून खळबळ उडाली होती, त्यानंतर त्यांनी आता माफी मागितली आहे.

बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर आहे, जो सदैव राहील. मी एक म्हण सांगितली, मी माझ्या मागे छत्री ठेवून स्वतःला शंकराचार्य आहोत असे म्हटले तर हे कसे होईल?’ ‘मला मनापासून दुःख झालं, दिलगिरी व्यक्त करतो’ धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आमच्या शंकराचार्यांनी जे सांगितले होते त्याचा आम्ही पुनरुच्चार केला. साईबाबा संत-फकीर असू शकतात आणि लोकांचा त्यांच्यावर वैयक्तिक विश्वास आहे. जर कोणी संत गुरुंना देव मानत असेल तर ती त्यांची वैयक्तिक श्रद्धा आहे. यात आमचा कोणताही आक्षेप नाही. माझ्या कोणत्याही बोलण्याने कोणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मला मनापासून वाईट वाटते. वाचा - हनुमान जयंतीवर केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, काय आहे आदेश? साईबाबांच्या भक्तांच्या भावना दुखावल्या विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, शंकराचार्यांना आपल्या धर्मात सर्वात मोठे स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचे स्थान दिलेले नाही. बागेश्वर धामच्या महंतांनी वादग्रस्त विधान करताना म्हटले होते की, कोणीही गिधडाचे कातडे घालून सिंह बनू शकत नाही. त्यांच्या बोलण्याने साईबाबांच्या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांना माफी मागण्यास सांगण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या