JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / 5 आणि 7 पानाच्या बेलपत्राचा व्हिडिओ झाला व्हायरल, भाविक म्हणाले, हा तर भगवान शंकराचा चमत्कार

5 आणि 7 पानाच्या बेलपत्राचा व्हिडिओ झाला व्हायरल, भाविक म्हणाले, हा तर भगवान शंकराचा चमत्कार

या मंदिरातील बेलपत्राच्या रोपावर एका व्यक्तीला दुर्मिळ पंचमुखी आणि सप्तमुखी बेलपत्र मिळाले.

जाहिरात

दुर्मिळ बेलपत्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवि पायक, प्रतिनिधी भीलवाडा, 16 जुलै : सध्या हिंदू धर्मातील पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या भक्तीचे फार महत्त्व आहे. शिवभक्त विविध प्रकारे भोलेबाबाचा श्रृंगार करतात आणि त्यांचा जलाभिषेक करतात. यामध्ये सर्वात खास आहे, बेलपत्र. याच बेलपत्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, हे पाच आणि सात पानाचे बेलपत्र खूप दुर्मिळ आहे. भाविकांचे म्हणणे आहे की, सामान्य बेलपत्र हे तीन पानांचे असते. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसणारे बेलपत्र हे पाच आणि सात पानांचे आहे. हा भगवान शंकराचा चमत्कार असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील अकोला गावात बनास नदीच्या किनाऱ्यावर शिवमंदिर आहे. या मंदिरातील बेलपत्राच्या रोपावर एका व्यक्तीला दुर्मिळ पंचमुखी आणि सप्तमुखी बेलपत्र मिळाले. असे म्हटले जाते की, तीन पानांपेक्षा जास्त पानांचे बेलपत्र हे भाग्यशाली व्यक्तीला मिळते. त्यांनी हे दोन्ही बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केले आहे. तसेच याचा व्हिडिओ सोशल माडियावर अपलोड केला. हा भगवान शिवजीचा चमत्कार असून लोक या व्हिडिओला खूप शेअर करत आहेत.

अकोला गावातील बनास नदीच्या किनाऱ्यावर मिळालेल्या या बेलपत्राबाबत मंदिराचे महंत रामस्नेही दास यांनी सांगितले की, मंदिराचे एक भाविक लोकेश आचार्य द्वारा भगवान शंकराच्या अभिषेकासाठी झाडावरुन बेलपत्र घेण्यात आली. यावेळी याठिकाणी एक दुर्मिळ पंचमुखी आणि सतमुखी बेलपत्रची पाने मिळाली. महंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलपत्र हे अनेकदा तीन पानांचेच असते. मात्र, जास्त पानांचे बेलपत्र हे परम भाग्यशाली व्यक्तीलाच मिळते. हे भगवान शंकराला अर्पित केल्याने भाविकाला अनंत पटीने फळ मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या