JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात मध्यरात्री रंगला खूनी थरार; बस थांब्यावरील तरुणाची डोक्यात फरशी घालून हत्या

पुण्यात मध्यरात्री रंगला खूनी थरार; बस थांब्यावरील तरुणाची डोक्यात फरशी घालून हत्या

Murder in Pune: शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात एका तरुणाची डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या (Brutal murder in pune at midnight) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 10 ऑक्टोबर: शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात एका तरुणाची डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या (Brutal murder in pune at midnight) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण गणेश पेठ पोलीस चौकी परिसरातील एका बसथांब्याजवळील फुटपाथावर थांबला असता, त्याठिकाणी आलेल्या व्यक्तींनी संबंधित तरुणाकडे पैशाची मागणी केली, यानंतर झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी तरुणाच्या डोक्यात फरशी घालून हत्या केली आहे. सूरज अनंत कामथे असं हत्या झालेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पुण्यातील गणेश पेठ परिसरातील रहिवासी आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मृत सूरज हा घराबाहेर पडला होता. यानंतर तो गणेश पेठ पोलीस चौकीसमोरील पीएमपी बस थांब्याजवळील फुटपाथावर थांबला होता. याठिकाणी थांबलं असताना, याठिकाणी काही तरुण आले, त्यांनी मृत सूरजकडे पैशाची मागणी केली. पण सूरजने पैसे देण्यास नकार दिला. हेही वाचा- अभ्यास ठरलं अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं कारण; कोल्हापुरातील हृदय हेलावणारी घटना विरोध दर्शवल्यामुळे मृत सूरज आणि आरोपींमध्ये वाद झाला. याच वादातून रागाच्या भरात आरोपींनी सूरजच्या डोक्यात जवळच पडलेली एक फरशी घातली. हा हल्ला इतका भयंकर होता की, या हल्ल्यात सुरज घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी मृत सूरजचा भाऊ स्नेहल काची याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा- बिझनेस मिटींगसाठी बोलवून तरुणीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सूरज कामथे हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर पुण्यातील काही पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला अंमली पदार्थांच व्यसन होतं. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या