पुणे, 23 जुलै: पावसाळी अधिवेशन संपले तरीही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या (MLAs appointed by Governor) निवडीचा प्रश्न काही सुटला नाही. शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना आमदारकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे नाव राज्यपालांकडे पाठवले आहे. ‘12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरं आहे, पण आमदारकी मिळाली तर आनंदच आहे’, असं म्हणत ऊर्मिला यांनी आपली इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. उर्मिला मातोंडकर आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्यातून अभियानाला सुरुवात झाली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना ऊर्मिला यांनी राज्यातील घडामोडींबद्दल भाष्य केलं. ‘मी पुण्यात चार दिवसांचा दौरा केला होता. कुणाला ही सांगितलं नव्हतं. माध्यमांना ही नाही. नाहीतर नेते एक केळ देतात आणि चार फोटो टाकतात. पण त्याऐवजी मला काम करायला आवडतं. विधान परिषदेची आमदारकी मिळाली तर आनंदच होईल. पण,सध्या 12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलं बरं आहे, असंही म्हणत ऊर्मिला यांनी आमदारकीची इच्छा बोलून दाखवली.
‘लव्ह जिहादला महाराष्ट्रात थारा नाही. अन्याय कुठल्याही प्रकारात असू द्या त्याला विरोध करायलाच हवा. शिवसेनेकडून कुणी विरोध करत असेल तर मी त्यांना ही सांगेन. या गोष्टी राजकीय फायदा घेण्यासाठी असा विरोध होतो, असं मत ऊर्मिला यांनी व्यक्त केलं. सचिन वाझे आणि माजी वनंमंत्री संजय राठोड यांचे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य ठरणार नाही. काही जण दिवसरात्र या विषयांवर ओरडत आहेत त्यावर मी काय बोलणार. कामाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत.लोकांच्या समस्या सोडून भलत्याच गोष्टींवर लोक बोलतात, असं म्हणत ऊर्मिला यांनी विरोधकांना टोला लगावला. पाय घसरून पडल्यानं गर्भवतीनं गमावलं बाळ; मिळाली 9 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ‘महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने जितकं उत्तम काम कोरोनाच्या काळात केलं असतं त्यापेक्षा जास्त उत्तम काम उद्धव ठाकरे यांनी केलंय आणि घराघरांतून त्यांना तशी पावती ही मिळाली. त्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे कोरोनाची परिस्थितीत नियंत्रणात मिळवता आली आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. ‘मुख्यमंत्र्यांनी पदभार घेतल्यापासून अत्यंत कठीण काळाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांनी धीरोदत्त राहून केला. श्रेय देऊ द्यात किंवा नको देऊ द्यात पण देशात सर्वात उत्तम काम त्यांनी केलं. त्यांच्यावर अनेकांनी केली. पण त्यांना उत्तर देण्यात वेळ न घालवता विकासावर लक्ष केंद्रीत केलंय. ओरडणारे ओरडतच राहतील, असं म्हणत विरोधकांना टोला लगावला.