JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे जिल्ह्यात रस्त्याची विनापरवानगी तोडफोड, गॅस एजन्सीला 45 लाखांचा दंड

पुणे जिल्ह्यात रस्त्याची विनापरवानगी तोडफोड, गॅस एजन्सीला 45 लाखांचा दंड

पुण्यातील महेश गॅस एजन्सीला 45 लाख 26 हजार 563 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जुन्नर, 30 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा सिमेंट काँक्रीटचे रस्ता गॅस लाईन टाकण्यासाठी विनापरवानगी खोदला. या बद्दल पुण्यातील महेश गॅस एजन्सीला 45 लाख 26 हजार 563 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे 14 तारखेला याबद्दल काही नागरिकांनी तक्रार केल्यावर 15 तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचनामा केला आहे. तर या गॅस एजन्सी ने 16 तारखेला रीतसर परवानगी मगितल्याचे उघड झाले आहे. बांधकाम विभागाच्या या दंडात्मक कारवाईमुळे काम बंद ठेवण्यात आले असून नारायणगाव मध्ये मोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

या सर्व प्रकारामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासोबत या गॅस एजन्सीने नूतन अष्टविनायक महामार्गाचेही मोठे नुकसान केल्याने यावर सुद्धा कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशा प्रकारे विनापरवानगी रस्त्याची तोडफोड करण्यात येते. परिणामी नव्याने बांधण्यात आलेले रस्तेही लवकरच खराब होता. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर नारायणगाव येथील घटनेबाबत जशी कारवाई झाली तशीच कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या