JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune: Uberची आता ‘ऑटो रेंटल’सेवा सुरु, 149 रुपये द्या आणि तासभर मनसोक्त फिरा!

Pune: Uberची आता ‘ऑटो रेंटल’सेवा सुरु, 149 रुपये द्या आणि तासभर मनसोक्त फिरा!

किमान 8 तासांचं बुकिंग ग्राहकांना करता येईल. तासाभरासाठी 149 एवढं भाडं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 28 ऑगस्ट: Uberची टॅक्सी सेवा आता भारतात आता चांगलीच रुजली आहे. लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याने आता Uberने ‘ऑटो रेंटल’सेवा सुरु केली आहे. पुण्यातून या सेवेला सुरुवात झाली. त्यामुळे नागरीकांना आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या सेवेची खास बाब म्हणजे ग्राहकांना तासाभरासाठी ऑटो बुक करता येणार आहे. पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद या महानगरांमध्येही ही सेवा उपलब्ध राहणार आहे. देशातल्या 6 मेट्रो शहरांमध्ये सुरु केलेल्या या सेवेचा विस्तार ग्राहकांच्या गरजेप्रमाणे करण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हटंलं आहे. Uberच्या Appव्दारे त्याचं बुकिंगही होणार आहे. किमान 8 तासांचं बुकिंग ग्राहकांना करता येईल. तासाभरासाठी 149 एवढं भाडं आहे. त्यामुळे तासाभरा तुम्हाला अनेक ठिकाणी जायचं असेल तर त्यासाठी रिक्षा बदलण्याची गरज नाही. कोरोनामुळे  रिक्षा चालकांना सर्वात जास्त फटका बसला आहे. सतत 3 महिने रिक्षाच बंद असल्याने रिक्षा चालकांवर रोजगाराचं संकट निर्माण झालं होतं. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून त्यात थोडा बदल झाला आहे. हे वाचा -   ‘चांद्रयान-3’साठी बंगळुरुजवळ तयार होणार चंद्रासारखे खड्डे, ISROचा प्लान तयार! आता रिक्षा सुरु असल्या तरी पूर्वी सारखा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार रिक्षा चालकांनी केली आहे. तर कोरोनाच्या संकटामुळे लोक रिक्षांमध्ये बसायला घाबरत आहे. रिक्षा चालकांनी आणि कॅब ड्रायव्हर्स यांनी काय खबरदारी घ्यायची याबद्दल वारंवार सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र त्या सूचनांचं पालन केलं जातं किंवा नाही याबद्दल लोकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही नवी सेवा सुरु केल्याचं बोललं जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या