'मी दोनवेळा दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरीही माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर भ्याडपणे शाईफेक झाली.
पुणे, 01 जानेवारी : महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडली होती. आज पुन्हा एकदा भिमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यास आल्यास शाई फेकू अशी धमकी दिली असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांनी घरून विजयस्तंभाला अभिवादन केलं. भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी पोहोचले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा भिमा कोरेगावला जाणार होते. मात्र, पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून आपल्यावर शाईफेक केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
‘कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून विजय स्तंभाला घरूनच अभिवादन करणार आहे. विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार आहे, असं चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं. (24 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…, भाजपकडून अजित पवारांना अल्टिमेटम) ‘मी दोनवेळा दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरीही माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर भ्याडपणे शाईफेक झाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आताही मी भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनाला आणि अभिवादनाला आलो तर शाईफेक करू अशी धमकी दिला आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे. पण आज भिमा कोरेगावमध्ये लाखो अनुयायी आलेले आहे. ( नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार शेतकऱ्याच्या बांधावर ) अशावेळी कोणतेही गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची इच्छा आहे. पण, लोकांची सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून विजयस्तंभालाा मानवंदना देणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.