JOIN US
मराठी बातम्या / पुणे / अंगणात पडणाऱ्याचा पावसाचा व्हिडीओ करत होता रेकॉर्ड अन् अचानक कोसळली वीज, थरारक LIVE VIDEO

अंगणात पडणाऱ्याचा पावसाचा व्हिडीओ करत होता रेकॉर्ड अन् अचानक कोसळली वीज, थरारक LIVE VIDEO

ही घटना पुण्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावात घडली. वीज पडल्यामुळे अनेक लोकांना विजेचे झटके सुद्धा बसले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुरंदर, 30 मे: मान्सूनचे (monsoon 2021) लवकरच आता आगमन होणार आहे. पण त्यापूर्वीच अवकाळी पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. पुण्यातील (Pune) पुरंदरमध्येही पावसाने हजेरी लावली आहे.  घराच्या दारात पडणारा पाऊस मोबाईलच्या (Mobile) कॅमेऱ्यात कैद करत असताना अचानक झाडावर वीज (lightning strike) कोसळली आणि एकच गोंधळ उडाला. वीज पडल्यामुळे अनेक लोकांना विजेचे झटके सुद्धा बसले. ही घटना पुण्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावात घडली. या गावात राहणारे संजय निगडे याच्या घरासमोर हा थरारक प्रकार घडला. पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हादायक झाले होते. त्यामुळे संजय निगडे हे घराच्या दारात उभं राहून बाहेर पडणार पाऊस मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होते.

संबंधित बातम्या

पण अचानक भलामोठा आवाज झाला आणि दारातील झाडावर वीज कोसळली. अवघ्या काही सेंकदाचा हा थरार होता, पण अंगणातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने तुळशीवृंदावन आणि झाड भर पावसात जळत होते. सरकार तुमचं WhatsApp चॅट वाचू शकणार? वाचा 3 रेड टिकमागच्या व्हायरल मेसेजचं सत्य दैव बलवत्तर म्हणून कोणीही या दुर्घटनेत जखमी झाले नाही अथवा कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र परिसरातील लोकांना विजेचे झटके चांगलेच बसले. घरातील विजेचा झटका लागतो तसा झटका काही क्षण बसला होता.  हा सगळा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद जरी झाला असला तरी या घटनेमुळे निगडे यांनी मात्र चांगलाच धस्का घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या