मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सरकार तुमचं WhatsApp चॅट वाचू शकणार? वाचा त्या 3 रेड टिकमागच्या व्हायरल मेसेजचं सत्य

सरकार तुमचं WhatsApp चॅट वाचू शकणार? वाचा त्या 3 रेड टिकमागच्या व्हायरल मेसेजचं सत्य

तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आता खासगी नाहीत. सरकार ते वाचू शकतं. सरकारने तुमचं चॅट वाचलं असेल, तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये एक अधिक टिक किंवा नवीन रंग दिसेल, असा फेक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आता खासगी नाहीत. सरकार ते वाचू शकतं. सरकारने तुमचं चॅट वाचलं असेल, तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये एक अधिक टिक किंवा नवीन रंग दिसेल, असा फेक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आता खासगी नाहीत. सरकार ते वाचू शकतं. सरकारने तुमचं चॅट वाचलं असेल, तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये एक अधिक टिक किंवा नवीन रंग दिसेल, असा फेक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 30 मे: तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) चॅटवर (Chat) तीन लाल रंगाचे टिक्स (Three Red Ticks) आले असतील, तर सरकारनं (Government) तुमचं चॅट वाचलं आहे, अशा आशयाचा एक संदेश सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. मात्र हा बनावट संदेश (Fake Message) असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपनं स्पष्ट केलं असून, युजर्सना अशा संदेशाबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी, भारत सरकारचे नवीन नियम यावरून वाद सुरू आहे. तसंच युजर्सनीही व्हॉट्सअ‍ॅपच्या या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर असे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे युजर्सनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

    या नुकत्याच व्हायरल झालेल्या बनावट संदेशात असा दावा करण्यात आला आहे की, तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आता खासगी नाहीत. सरकार ते वाचू शकतं. सरकारने तुमचं चॅट वाचलं असेल, तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये एक अधिक टिक किंवा नवीन रंग दिसेल. त्यावर सरकारला कारवाई करायची असेल, तर एक निळ्या रंगाची टिक आणि दोन लाल रंगाच्या टिक्स दिसतील. तीन लाल टिक्स आल्यास त्याचा अर्थ असा आहे की, युजरला कोर्टातून समन्स पाठवण्यात येत आहे.

    (वाचा - Paytm मधून चुकून दुसऱ्यालाच पैसे झाले ट्रान्सफर? जाणून घ्या कसे मिळवाल परत)

    सध्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये दोन-टिक दिसतात. एखादा संदेश पाठवल्यावर एक टिक दिसत असेल, तर त्याचा अर्थ तो मेसेज पाठवला गेला आहे, पण दुसऱ्या युजरला मिळालेला नाही असा होतो. संदेश प्राप्त झाल्यावर दोन टिक्स दिसतात आणि तो मेसेज त्या युजरनं वाचला असेल तर हे दोन टिक्स निळे (Two Blue Ticks) होतात.

    व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (Encrypted) असतं. म्हणजेच हे चॅट कोणीही वाचू शकत नाहीत. कोणतंही सरकार किंवा तृतीय पक्ष (Third Party) यापर्यंत पोहोचू शकत नाही, असं व्हॉट्सअ‍ॅपनं स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपनं भारताच्या सरकारनं लागू केलेल्या नव्या आयटी नियमांविरूद्ध (IT Rules) दावा दाखल केला आहे. त्यानंतर असे बनावट संदेश व्हायरल होत असून याद्वारे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा कंपनीनं केला आहे.

    (वाचा - Explainer : चुकीच्या माहिती प्रसाराला आळा बसण्यासाठी Facebook चं मोठं पाऊल)

    कंपनीने असे कोणतेही मेसेज प्रसृत केलेले नाहीत, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन व्हॉट्सअ‍ॅपनं केलं आहे. लोकांनी असे कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नयेत आणि असे मेसेज आल्यास त्याबाबत रिपोर्ट करावा असं कंपनीनं म्हटलं आहे.

    First published:

    Tags: Whatsapp, WhatsApp chats, Whatsapp messages