आनिस शेख, प्रतिनिधी मावळ, 09 मे: पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे असलेल्या मायमर या खासगी कोविड सेंटरमध्ये (Myanmar covid center) उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) माजी शाखाप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयसीयू शेजारील असलेल्या एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ हुलावळे (वय 45) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथ हुलावळे हे शिवसेनेत होते. शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. 1 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याने सोमनाथ हुलावळे यांना उपचाराकरिता मायमर कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याबाबत हुलावळे यांनी आपल्या नातेवाईकांना फोनद्वारे अनेक वेळा माहिती दिली होती. परंतु, अचानक त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनामुळं पतीचा मृत्यू; मृतदेह पाहून पत्नीची दवाखान्यात सहाव्या मजल्यावरून उडी तर दुसरीकडे, रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णाने आत्महत्या केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे संबंधित रुग्णालयावर कारवाईची मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी याच मायमर रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बिल न दिल्याच्या कारणावरून 3 दिवस डांबून ठेवण्यात आला होता. परंतु, मावळ तालुक्याचे खासदार यांनी घटनास्थळावर धाव घेत मध्यस्थी करून मृतदेह तात्काळ अंत्यविधी करण्यासाठी रूग्णालय प्रशासनाला भाग पाडले. गोशाळेत उघडलं कोरोना सेंटर, रुग्णांना दिली जातायंत दूध-गोमुत्रापासून बनलेली औषधं इतकेच नव्हे तर या गंभीर घटनेची दखल राज्य शासनाने घ्यावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील तक्रार केली. त्या अनुषंगाने या मायमर रुग्णालयावर गुन्हा देखील पोलिसांनी दाखल केला आहे. शहरात आज घडलेल्या या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे. या आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण छडा पोलीस कशाप्रकारे लावतील हे महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास तळेगाव पोलीस करत आहेत.