JOIN US
मराठी बातम्या / पुणे / जीव गेला पण नागाला रोखलंच; चिमुकल्यांना वाचवण्यासाठी कुत्र्याची कोब्राशी झुंज, पुण्यातील घटना

जीव गेला पण नागाला रोखलंच; चिमुकल्यांना वाचवण्यासाठी कुत्र्याची कोब्राशी झुंज, पुण्यातील घटना

Pune News: पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका भटक्या कुत्र्यानं (Stray dog) आपला जीव धोक्यात घालून बागेत खेळणाऱ्या काही लहान मुलांचा जीव वाचवला आहे. संबंधित कुत्र्यानं शेवटपर्यंत कोब्रा या विषारी नागाशी झुंज (Stray dog fights with cobra) दिली आहे.

जाहिरात

(File Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 ऑगस्ट: आपल्या घराच्या आसपास भटकणाऱ्या कुत्र्यांचा अनेक नागरिकांना त्रास होतं असतो. अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांकडून अनेकदा मागणी केली जाते. पण पुण्यातील (Pune) वडगाव शेरी (Vadgaon Sheri) परिसरातील एका भटक्या कुत्र्यानं मात्र आपला जीव धोक्यात घालून बागेत खेळणाऱ्या काही लहान मुलांचा जीव वाचवला (Dog saved children’s Life) आहे. अचानक कंपाऊंडमध्ये शिरून बागेत खेळणाऱ्या मुलांच्या दिशेनं जाणाऱ्या एका कोब्रा जातीच्या नागाला एका भटक्या कुत्र्यानं रोखून (Stray dog fights with cobra) धरल्याची घटना समोर आली आहे. संबंधित कुत्र्यानं विषारी कोब्राशी अखेरपर्यंत झुंज देत त्याचा फडशा पाडला आहे. पण कोब्रानं दोनवेळा सर्पदंश केल्यानं कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. कोको असं संबंधित भटक्या कुत्र्याचं नाव असून ही घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील ब्रम्हा सनसिटी सोसायटीच्या गार्डनमध्ये घडली आहे. याच सोसायटीत राहणारी एक प्राणी प्रेमी महिला या कुत्र्याला दररोज खायला टाकायची. त्यामुळे या सोसायटी परिसरातच या कुत्र्याचा वावर होता. दरम्यान काल शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कोब्रा जातीचा विषारी साप या सोसायटीत शिरला होता. या नागाला पाहून कोकोनं त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला रोखून धरलं. हेही वाचा- 5वर्षांनी भेटलं हरवलेलं प्रेम; पंजाबमधून गायब झालेली पत्नी अचानक येरवड्यात दिसली हा नाग गार्डनमध्ये खेळणाऱ्या लहान मुलांच्या दिशेनं जात होता. पण कोकोनं कोब्राचा रस्ता रोखून धरला. यामुळे कोब्रा नागासोबत श्वानाची झटापट झाली. या झटापटीत कोकोनं कोब्रा नागाला चावा घेत, त्याचे तुकडे केले. पण कोब्रानंही झटापटीत कोकोला दोनदा दंश केला. यामुळे कोब्राच्या मृत्यूनंतर काही वेळात कोकोचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित कुत्र्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी कुत्र्याला मृत घोषित केलं. हेही वाचा- VIDEO : आपसात भिडल्या विद्यार्थीनी; एकमेकींची लाथा-बुक्क्यांनी केली धुलाई दुसरीकडे, स्थानिकांनी सर्पमित्रांना बोलवून कोब्रा नागालाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही मृत्यू झाला होता. संबंधित नाग हा कोब्रा जातीचा विषारी नाग असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली. या घटनेनंतर स्थानिकांनी संबंधित कुत्र्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले आहेत. या कुत्र्यानं नागाचा रस्ता रोखला नसता, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी भावना स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या