पुणे, 07 मे : सध्या संपूर्ण देश कोरोना संसर्गाला झुंज देत असताना पुण्यात हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे एका सलाइनच्या सीलबंद बाटलीत शेवाळ आढळलं आहे. सध्या स्वच्छता आणि आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बनला असता अशा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने नागरिकांची भीती आणखी वाढली आहे. एका खासगी रुग्णलायात हा प्रकार घडला आहे. निष्काळजीपणा कळस असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. सलाइनच्या सीलबंद बाटलीत शेवाळ आढळलं म्हणजे एकतर ही बॉटल बरीच जुनी असावी. त्यामुळे यामध्ये शेवाळ तयार झालं. पण इतक्या जुन्या सलाइनच्या बाटल्या कंपनीतून रुग्णालयात पोहोचल्याच कशा? या बाटल्यांची तपासणी का केली गेली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
सलाइन बनविणाऱ्या कंपन्यांचा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी स्वत:च हा प्रकार समोर आणला आणि आलेल्या संर्व बाटल्यांचा वापर तात्काळ थांबवला. दरम्यान, यासंबंधी डॉक्टरांनी पोलिसांकडे जाण्यास नकार दिला आहे.