JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पिंपरीत पोलीस अधिकारी असल्याचं सांगत शिक्षिकेवर बलात्कार; शीतपेय पाजून केला गैरप्रकार

पिंपरीत पोलीस अधिकारी असल्याचं सांगत शिक्षिकेवर बलात्कार; शीतपेय पाजून केला गैरप्रकार

Crime in Pune: निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करून देणारी मुंबईतील साकीनाका येथील घटना ताजी असताना, पुण्यात आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

प्रवीण नागेश जर्दे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. (File Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 सप्टेंबर: मागील तीन चार दिवसांत बलात्कारांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करून देणारी मुंबईतील साकीनाका येथील घटना ताजी असताना, पुण्यात आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरीतील (Pimpari) एका व्यक्तीनं पोलीस अधिकारी (Claiming as police officer) असल्याचं सांगत शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार (rape on female teacher) केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडित शिक्षिकेचे अश्लील फोटो (Obscene Photo) देखील काढले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. विकास अवस्थी असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. आरोपी विकास अवस्थी यानं निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचं सांगत पीडित महिलेवर अत्याचार केला आहे. पीडित शिक्षिकेनं नराधम आरोपीचा विरोध केला असता, ‘तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकेन, मी सहाय्यक पोलीस आयुक्त आहे. माझं कोणीही काही करू शकत नाही, अशी धमकी दिल्याचंही पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. हेही वाचा- वेडी ठरवत पतीनेच पत्नीला भोंदूबाबाच्या स्वाधीन केलं; घृणास्पद घटनेनं पुणे हादरलं नेमकं काय घडलं? आरोपी विकास अवस्थीचा सावकारीचा व्यवसाय असून तो 10 टक्के व्याजानं लोकांना पैसे देतो. आरोपी अवस्थी हा पीडित महिलेच्या ओळखीचा होता. दरम्यान पीडित शिक्षिकेला पैशांची गरज होती. आर्थिक अडचण असल्यानं पीडित शिक्षिकेनं आरोपीकडे पैशांची मागणी केली. दहा टक्के व्याजानं पैसे देतो, असं सांगून आरोपीनं पीडित शिक्षिकेला घरी बोलवलं. याठिकाणी आरोपीनं दोन कोऱ्या चेकवर आणि कागदावर पीडितेच्या सह्या घेतल्या. यानंतर तिला सॉफ्टड्रिंक पाजून तिच्यासोबत गैरप्रकार केला आहे. हेही वाचा- साकीनाका बलात्कार प्रकरण: उपचारादरम्यान मुंबईतील ‘निर्भया’चा मृत्यू नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटोही काढले आहेत. तसेच संबंधित फोटो सर्वांना दाखवून बदनाम करण्याची धमकीही दिली. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित शिक्षिकेनं आरोपीविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं जबरदस्तीनं बलात्कार केल्याचा आरोपी पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे. या घटनेचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या