मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

साकीनाका बलात्कार प्रकरण: पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मुंबईतील 'निर्भया'चा मृत्यू

साकीनाका बलात्कार प्रकरण: पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मुंबईतील 'निर्भया'चा मृत्यू

महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या मुंबईतील (Mumbai) साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape Case) प्रकरणामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या मुंबईतील (Mumbai) साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape Case) प्रकरणामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

Sakinaka rape case victim dies: साकीनाका बलात्कार पीडितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

मुंबई, 11 सप्टेंबर : मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरातील साकीनाका येथे बलात्कार (Sakinaka Rape Case) झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital Mumbai) पीडित महिलेवर उपचार सुरू होते. पीडित महिला अद्यापही बेशुद्धावस्थेत होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक होती. पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला. (Sakinaka rape case victim died)

सैतानालाही लाजवेल असं कृत्य आरोपीने केलं होतं. पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. इतकेच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती. आरोपीने केलेल्या या कृत्त्यात पीडित महिलेची अवस्था खूपच चिंताजनक होती.

आरोपीने भररस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोत हे कृत्य केलं होतं आणि त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती, तपासात समोर आली धक्कादायक माहिती

काही वेळापूर्वीच पीडित महिलेच्या प्रकृतीची चौकशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन केली होती. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली होती की, पीडित महिलेसोबत तिची आई आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, गेली 10-12 वर्षांपासून जो इसम टेम्पोजवळ सापडला त्याच्यासोबत राहत होती आणि त्यांच्यात वारंवार भांडणे सुद्धा होत होती. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाबाबत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन सांगितले.

ज्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पीडित महिला रक्तबंबाळ अवस्थेत टेम्पोत आढळून आली. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी मोहन चौहान याला अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Mumbai