'मला कोणाचा खून करायला सांगितलं तर मी...' - राज ठाकरे

मला एखाद्याचा खून करायला सांगितलं तर... !

Renuka Dhaybar
पुणे, 02 जुलै : राज ठाकरेंना एक खून करायचाय. ऐकून धक्का बसेल, पण स्वतः राजच तसं म्हणाले आहेत. नको तिथे सेल्फी काढणाऱ्यांना चिमटा काढण्यासाठी राज ठाकरेंनी मोबाईलमध्ये कॅमेरा बसवणाऱ्याचा खून करायची इच्छा मिश्किल शब्दात बोलून दाखवली. पुण्यामध्ये अहिल्याबाई होळकर उद्यानाचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी ते बोलेत होते.उद्यानाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढण्यात धन्यता मानणाऱ्यांना राज ठाकरेंनी असा टोला लगावला आहे. आमच्या नगरसेवकांनी प्रभागात कचऱ्यासंदर्भात चांगली कामं केलीत पण निवडणुकीत मतदान मात्र होत नाही. मग कोण काम करणार असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक

आमच्या नगरसेवकांनी प्रभागात कचऱ्यासंदर्भात चांगली काम केलीत. पण निवडणुकीत मतदान मात्र होत नाही. मग कोण काम करतील असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मी जे जे बोललो ते सगळे ठोकताळे खरे होत असल्याचंही ते म्हणाले.हेही वाचा...इंच इंच विकू हेच राज्यकर्त्यांचं धोरण - राज ठाकरेबुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागाबेताल विधान करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी

Trending Now