पुणे, 19 जून: पुण्यात (Pune) पुन्हा एकदा विकेंड (Weekend Lockdown)लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज आणि उद्या म्हणजे शनिवारी रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा (Essential Service)आणि हॉटेल्सची पार्सल सेवा सुरू राहणार आहे. राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार तसंच पुण्यातील सध्याच्या परिस्थितीनुसार पुणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये विकेंडला कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. पुणे महानगर पालिकेकडून यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आलं आहे. तसंच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना बैठक होईल त्या नंतरच आणखी निर्बंध शिथील होणार का हे समजेल, असंही सांगण्यात आलं आहे.
शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार ! पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, असं ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. हेही वाचा- शिवसेना @55, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार एकूणच पुण्यात विकेंड लॉकडाऊनसह विकेंड भटकंतीला नो एंट्रीच असेल. पानशेत धरण ,खडकवासला धरण, जलाशय तसेच लोणावळा, खंडाळा,सिंहगडसह जिल्ह्यातील गड किल्ले येथे पावसाळी पर्यटनावर निर्बंध जारी असल्याने विकेंडला गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.