पुणे, 11 जून: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील कोरोना (Pune Corona Virus) परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. पुण्यातील निर्बंध (Pune Unlock) सोमवारपासून शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडसाठी निर्बंध शिथिल करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वर आहे. म्हणून पुण्यातील निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. पुण्यातील दुकानं संध्याकाळी सात पर्यंत उघडी राहणार आहे. 50 टक्के क्षमतेनं ही दुकानं सुरु असतील. हॉटेलही रात्री 10 पर्यंत 50 टक्क्यांच्या क्षमतेनं सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के उपस्थितीत सुरू होणारेय. मॉल सुरु होणार आहेत. पण सोमवारी मॉल बाबत नियमावली जाहीर करण्यात येईल. तर सिनेमा ,नाट्यगृह बंद राहतील. हे नवे नियम सोमवारपासून लागू होतील. हेही वाचा- ‘‘माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो…’’ राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन निर्बंध जरी शिथील करण्यात येत असले तरी लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावं, आवाहन अजित पवारांनी केले आहे. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास इतर ठिकाणीही निर्बंध शिथिल करण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले. 18 वर्षांच्या पुढील दिव्यांगाचे लसीकरण सुरू करणार असल्याचं सांगत अजित पवारांनी शनिवारी ,रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार असल्याचंही सांगितलं आहे. हेही वाचा- मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई, ठेकेदारास अटक पुण्यात सोमवार म्हणजेच 13 जून पासून अधिक शिथिलता येईल. मात्र संसर्ग दर 5 टक्केच्या आत राहिला पाहिजे. संसर्ग दर 5 टक्केच्या वर गेला की पुन्हा निर्बंध लागू करण्यात येतील. शनिवारी रविवारी संसर्ग दर 5 टक्के च्या आत राहिला तर पुणे लेव्हल 2 मध्ये जाईल, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.