जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई, ठेकेदारास अटक

मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई, ठेकेदारास अटक

मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई, ठेकेदारास अटक

मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी (Malad Building Collapse)मालवणी पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे. पोलिसांनी ठेकेदारास अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जून: गुरुवारी मुंबईत (Mumbai rains) झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Malad Building Collapse) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी एका व्यक्तीला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा ठेकेदार असल्याचं समजतंय. मालवणी पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार रमजान शेख याला अटक केली आहे. तसंच इमारत मालक रफिक सिद्दीकी यालाही आरोपी करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 मुलांसह 9 जणांचा करुण अंत झाला आहे. तर 17 जण यात गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. हेही वाचा-  Watch Video:सकाळी सकाळी पुण्यात कोणावर बरसले अजित पवार? या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची कांदिवलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात