JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे तिथे काय उणे, टेबलाघालून घेण्यातही पटकावला अव्वल क्रमांक, इतर शहरांची काय स्थिती?

पुणे तिथे काय उणे, टेबलाघालून घेण्यातही पटकावला अव्वल क्रमांक, इतर शहरांची काय स्थिती?

पुण्यात पोलीस आणि महसूल खात्यात भ्रष्टाचार जास्त असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे.

जाहिरात

टेबलाखालून घेण्यात पुणे एक नंबर तर औरंगाबाद तिसऱ्या स्थानी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 जानेवारी : पुणे आणि पुणेकरांच्या सगळ्याच गोष्टींची सोशल मीडियावर खूप चर्चा होते. पुणे तिथे काय उणे अशी म्हणही प्रचलित आहे. अनेक बाबतीत पुणे अव्वल क्रमांकावर असतं. भ्रष्टाचाराबाबतही तसंच म्हणावं लागेल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच भ्रष्टाचाराचे गुन्हे आणि आरोपी यांच्याबाबतची आकडेवारी जाहीर केली. त्यात पुणे पहिल्या, नाशिक दुसऱ्या, तर नागपूर पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी (2022) पुण्यात भ्रष्टाचाराच्या 155 गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात 223 सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. नाशिक विभागात 126 सापळे रचून 178 जणांना पकडण्यात आलं. तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद असून, 122 सापळे रचून तिथे 157 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं. नागपूरमध्ये 74 सापळे रचून 101 जणांना पकडण्यात आलं. पुणे विभागात महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराच्या सर्वांत जास्त घटना घडल्या आहेत. सलग दुसऱ्या वर्षी पुणे यात पहिल्या क्रमांकावर आहे. सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये लाच दिल्याशिवाय कामं होत नाहीत. आता रोख रकमेऐवजी सोन्याचे दागिने किंवा मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची लाच दिली जाते. विशेष गोष्ट म्हणजे महिला अधिकारीही यात आघाडीवर आहेत. पोलीस आणि महसूल खात्यात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अनेकदा लाच मागितल्याचं यात समोर आलंय. वाचा - पुणे : मुलगी झाली अन् आईचं भयानक कृत्य, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं बाळ केवळ महिलाच नाही, तर पोलीस आणि महसूल खात्यातले पुरुषही लाच घेणाऱ्यांमध्ये समाविष्ट आहेत. त्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यात 160 सापळे रचले होते. त्यात 224 आरोपी पकडले गेले. महसूल विभागातल्या 175 सापळ्यांमध्ये 246 आरोपी पकडले गेले. केवळ लाच म्हणून मागितलेल्या रकमेचा विचार केल्यास, पोलीस खात्यामधून सर्वांत जास्त लाच मागितल्याचं दिसून येतंय.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 2022मध्ये भ्रष्टाचाराच्या 720 तक्रारींची नोंद करण्यात आली. त्यात लाच घेणाऱ्या 1033 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यापैकी 76 क्लास वन अधिकारी आहेत, 123 क्लास टू अधिकारी आहेत. सर्वांत जास्त आकडा क्लास थ्री कर्मचाऱ्यांचा आहे. राज्यात भ्रष्टाचाराच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. त्यातही पुणे विभागात भ्रष्टाचाराच्या तक्रारी जास्त आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या तक्रारींची नोंद केली असता, सापळे रचून आरोपींवर कारवाईही केली जात आहे; मात्र तरीही अशा वाढत्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी यावर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या