JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणेकरांना चिंतेत टाकणारी बातमी, Mucormycosisचा वाढतोय धोका

पुणेकरांना चिंतेत टाकणारी बातमी, Mucormycosisचा वाढतोय धोका

पुण्यातील कोरोना संसर्गाची (Corona Virus) दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. दुसरीकडे म्युकरमायकोसिसनं पुणेकरांची चिंता वाढवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 मे: पुण्यातील कोरोना संसर्गाची (Corona Virus) दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. चालू आठवड्यात तब्बल तीन वेळा दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा 3 अंकी संख्येच्या आत म्हणजेच हजारांच्या खाली राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे पुण्यात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच ब्लॅक फंगस (Black Fungus) नं डोकंवर काढलं आहे. पुण्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना कमी होत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसनं पुणेकरांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत पुणे (Pune) जिल्ह्यामध्ये तब्बल 353 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात 353 म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडले. त्यापैकी तब्बल 167 रुग्ण हे पुणे शहरातले असून 11 रुग्ण हे पुणे ग्रामीणमधले आहेत. हेही वाचा-  पोटात दुखल्यास दुर्लक्ष करु नका, दिल्लीत छोट्या आतड्यांमध्ये आढळला ब्लॅक फंगस दरम्यान शहराप्रमाणेच पिंपरी- चिंचवडमध्ये सुद्धा म्युकरमायकोसिसचा फैलावा होताना दिसत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एकूण 45 बाधित रुग्णांवर सध्या पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापर्यंत 90 रुग्णांना म्युकरमायकोसिसचा लागण झाली असून त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 9 ससून रुग्णालय आणि एक मृत्यू पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात झाल्याचं समजतंय. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरात वाढणाऱ्या म्युकरमायकोसिस आणि त्या तुलनेनं अपुरं पडणारं इंजेक्शन याविषयी भूमिका स्पष्ट केली होती. पुण्यात कोरोना आटोक्यात दुसऱ्या लाटेत पुणे शहरात कोरोनानं थैमान घातलं होतं. पण आता काही प्रमाणात दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे. तर पुणे ग्रामीण भागात अजूनही रुग्णवाढ नियंत्रणात आली नाही आहे. ग्रामीणमध्येही आजही 1500 च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. थोडक्यात शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात पसरु लागल्याचं चित्र काही ठिकाणी बघायला मिळत आहे. हेही वाचा-  हुंड्यात बुलेट मागणं नवरदेवाला पडलं चांगलंच महागात, नवरा थेट तुरुंगात पुणे शहरात दुसऱ्या लाटेची एप्रिल महिन्यात शहरातली दैनंदिन रूग्णवाढ ही 7 हजारांवर होती. तर ग्रामीण भागातली 4 हजारांवर जाऊन पोहोतली होती. ती आता अनुक्रमे हजार आणि दिड हजारांपर्यंत खाली आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या