JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune Love Marriage Crime : प्रेमविवाह केला, मुलीच्या घरच्यांना सहन झालं नाही, पुण्यात सैराटपेक्षा भयानक घडलं

Pune Love Marriage Crime : प्रेमविवाह केला, मुलीच्या घरच्यांना सहन झालं नाही, पुण्यात सैराटपेक्षा भयानक घडलं

प्रेमविवाहातून पुण्यातील लोणी काळभोर परिसरात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमविवाहावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 23 फेब्रुवारी : पुण्यात दिवसेंदिवस प्रेमप्रकरणातून भांडण होत असल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी प्रेमविवाहातून पुण्यातील लोणी काळभोर परिसरात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमविवाहावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ मंदिर परिसरातील एका 52 वर्षीय व्यक्तीने या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा :  …म्हणून हिंदूंनी निदान 5-6 मुलं तरी जन्माला घालावीत; देवकीनंदन महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाने पुण्याच्या लोणीकाळभोर गावातील एका मुलीसोबत प्रेम विवाह केला. त्या गोष्टीचा राग मुलीच्या घरातील लोकांना आला. याकारणातून चौघांनी मिळून तक्रारदार यांच्या मुलाला पाईपने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या इतर साथीदारांना देखील मारहाण केली. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील दोघांना अटकही करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

तसेच समोरच्या व्यक्तींनी देखील फिर्यादी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, बहिणीने एका तरुणासोबत प्रेमविवाह केला आहे. त्याचा त्यांना राग होता.

दरम्यान, आरोपींपैकी एका तरुणाने फिर्यादीच्या चुलत्यांना त्याच्याबाबत खोटे सांगितले. त्याचा जाब विचारण्यासाठी तो तेथे गेला होता. त्यावेळी त्याने व त्याच्या इतर तिघा साथीदारांनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच स्टीलच्या पाईपाने देखील मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  पुण्यात नवले पुलावरून तरुणीची उडी; पोलीस मदतीला धावले पण…

हा प्रकार सुरू असताना त्याचे वडील भांडण सोडवण्यासाठी आले असताना, त्यांना देखील धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली आहे. याबाबत तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रेमविवाह करणार्‍या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या