JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मूळच्या पुण्याच्या IPS ऑफिसरनी मृत्यूशीही दिली यशस्वी झुंज; आसाम-मिझोराम संघर्षात झेलाव्या लागल्या होत्या गोळ्या

मूळच्या पुण्याच्या IPS ऑफिसरनी मृत्यूशीही दिली यशस्वी झुंज; आसाम-मिझोराम संघर्षात झेलाव्या लागल्या होत्या गोळ्या

आसाम-मिझोराम सीमा संघर्षात (Assam -Mizoram Border Conflict) गंभीर जखमी झालेले आसाममधील कछर जिल्ह्याचे (Cachar SP) पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर मूळचे पुण्याचे. त्यांच्या प्रकृतीबद्दल चांगली बातमी आली आहे. या IPS अधिकाऱ्याच्या झुंजीची कथा..

जाहिरात

आसाम केडरचे IPS अधिकारी वैभव निंबाळकर मूळचे पुण्याचे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुवाहाटी, 12 ऑगस्ट: आसाम-मिझोराम सीमा संघर्षात (Assam -Mizoram Border Conflict) गंभीर जखमी झालेले आसाममधील कछर जिल्ह्याचे (Cachar) पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर (Vaibhav Nimbalkar) यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून ते आता वॉकरच्या सहायाने पावले टाकू शकत आहेत. नुकताच त्यांचा हॉस्पिटलमध्ये वॉकर घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असतानाचा एक फोटो त्यांची पत्नी अनुजा हिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रातील जनतेनं आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा हा निधड्या छातीचा वीर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिल्याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. निंबाळकर यांचे कुटुंबीय, सुहृद, मित्र परिवार यांच्यासह आसामच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागालाही दिलासा मिळाला आहे. सेंटीनेल ई-पेपरनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर हे सध्या मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात (Kokilaben Ambani Hospital) उपचार घेत आहेत. डॉक्टरांनीही निंबाळकर यांच्या प्रकृतीतील या सुधारणेबद्दल समाधान व्यक्त केलं असून त्यांच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत असल्याचं नमूद केलं आहे. मूळचे पुण्याचे (Pune) असलेले वैभव निंबाळकर 2009च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, भारतीय पोलिस सेवेत निवड झालेले ते सर्वांत तरुण अधिकारी आहेत. आसाम केडर प्राप्त झाल्यापासून ते आसाममध्ये कार्यरत आहेत. राज्यातल्या या खासदाराच्या मुलीचा बालहट्ट पंतप्रधानांनी केला पूर्ण 26 जुलै रोजी आसाम-मिझोराम यांच्यातील सीमावादावरून वादग्रस्त लैलापूर भागात हिंसक चकमक उडाली, त्यात गोळीबारात आसामच्या पोलिस दलातील 6 पोलिसांचा मृत्यू झाला, तर वैभव निंबाळकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह अन्य 60 पोलिसही जखमी झाले. या गोळीबारात वैभव निंबाळकर यांच्या ओटीपोटात आणि मांडीच्या हाडाला गोळी लागल्यानं अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आधी सिलचर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर इतर तिघांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. UPSCच्या तयारीसाठी वडिलांनी विकलं घर; प्रदीप सिंहांनी IAS होऊन कष्टाचं केलं चीज सिलचर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू असताना वैभव निंबाळकर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीनं हेलिकॉप्टर अम्ब्युलन्सच्या सहायानं मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सतरा- अठरा दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या जखमा बऱ्या होत असून, ते हळूहळू हिंडू-फिरू लागले आहेत. डॉक्टरांनीही याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. कोरोनाची लस न घेतल्यामुळे वायूदलातून एकजण बरखास्त एक धाडसी अधिकारी म्हणून वैभव निंबाळकर यांची ख्याती असून अशा अधिकाऱ्याला आणि अन्य पोलिसांना अशा राज्यांमधील सीमावादातून झालेल्या संघर्षात गोळ्या झेलाव्या लागाव्यात यावरून देशभरात सर्वत्र टीकेची झोड उठली होती. दोन राज्यांच्या सीमावादावरून पोलीस दलांमध्ये झालेला हिंसाचाराचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या