पुणे, 04 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) देशासमोर रुग्णसंख्या (Patient numbers) आणि कोरोनाच्या बाबतीत पुणं (Pune) सर्वाधिक चिंतेचा विषय बनलेलं होतं. त्यात पुण्यानं आता चांगल्या अर्थानं देशासमोर आदर्श उभा केला आहे. पुणे शहराचा (Pune City) कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा देशात सर्वाधिक ठरला आहे. कोरोनाच्या संकटात केलेल्या उपयायोजना आणि त्यानंतर लसीकरण तसेच इतर प्रयत्नांमधून पुण्याला हे यश मिळवता आलं आहे. (वाचा- ‘आमच्याकडे नाही, अमेरिकेतच शोधा’, कोरोनाच्या उगमावरून चीनच्या उलट्या बोंबा ) कोरोनाची दुसरी लाट आल्याचं मार्च महिन्याच्या अखेरीस स्पष्ट झालं होतं. त्याच्या आधीपासूनच जवळपास महिनाभर तशी चर्चा आणि संकेतही मिळत होते. पण ज्या वेगानं या काळात रुग्णांची संख्या वाढायला लागली तो सर्वांसाठी चिंतेचा विषय होता. देशात तर महाराषट्रानं सगळ्यांच्या चिंता वाढवल्या होत्या. कारण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांचं प्रमाण असलेल्या पहिल्या दहा जिलह्यांमध्ये सात ते आठ राज्यातले होते. त्यामुळं परिस्थिती अत्यंत गंभीर होती.
राज्याची ही परिस्थिती साहजिकच धोकादायक होती. यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चिंताजनक संख्या समोर येत होती. पण राज्यातील दोन सर्वात महत्त्वाच्या शहरांनी प्रशासनाची धडधड वाढवली. मुंबई आणि पुणे. पुण्यामध्ये तर कोरोना रुग्णसंख्या रोज नवनवे उच्चांक गाठत होती. आरोग्य व्यवस्था जणू कोलमडून पडणार का असं वाटत असतानाच प्रशासनानं उपाययोजनांचा वेग अधिक वाढवला. त्याचा परिणाम समोर आला आणि पुण्यानं त्याच वेगानं पुन्हा रुळावर येत आता परिस्थितीवर जवळपास पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे. (वाचा- जागोजागी पैसेच पैसे! 30 वर्षांपासून भीक मागणाऱ्या महिलेच्या झोपडीत लाखोंचं घबाड ) पुणे शहराचा कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट हा शुक्रवारी 97.15 टक्क्यांवर पोहोचल्याचं समोर आलं आहे. राज्यातच नव्हे तर देशात हा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. परिणामी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग हा 899 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. पुण्यानं केलेल्या उपययोजनांमध्ये लसीकरणाचा मोठा वाटा होता. पुण्यात लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. त्यामुळंदेखिल परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं आतापर्यंत पुण्यात 11 लाख 22 हजार 811 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. पुणे शहरामधली रुग्णसंख्या घटल्यानं कंटेन्मेंट झोनमध्येदेखिल मोठी घट झाली आहे. शहरात फक्त 28 कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं पुण्यातली संपूर्ण राज्याच्या चिंता वाढवलेल्या पुण्यानं कोरोनावर मात करण्याच्या शर्यतीतही आघाडी घेतली आहे. आता सर्व पुणेकरांनी काळजी घेऊन ही स्थिती कायम ठेवणं गरजेचं आहे.