JOIN US
मराठी बातम्या / पुणे / नयना पुजारी बलात्कार प्रकरणात आरोप निश्चित, उद्या 3 दोषींना सुनावणार शिक्षा

नयना पुजारी बलात्कार प्रकरणात आरोप निश्चित, उद्या 3 दोषींना सुनावणार शिक्षा

08 मे : सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हत्येप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचे आरोप निश्चित झाले आहेत. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला असून उद्या (मंगळवारी) या तिन्ही आरोपींविरोधात शिक्षा सुनावली जाणार आहे. सिनिक्रॉन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारी हिचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा निघृण हत्या केली होती. या प्रकरणी योगेश अशोक राऊत, राजेश पांडुरंग चौधरी, महेश बाळासाहेब ठाकूर, विश्वास हिंदुराव कदम या चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

08 मे : सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हत्येप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचे आरोप निश्चित झाले आहेत. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला असून उद्या (मंगळवारी) या तिन्ही आरोपींविरोधात शिक्षा सुनावली जाणार आहे. सिनिक्रॉन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारी हिचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा निघृण हत्या केली होती. या प्रकरणी योगेश अशोक राऊत, राजेश पांडुरंग चौधरी, महेश बाळासाहेब ठाकूर, विश्वास हिंदुराव कदम या चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 8 ते 9 आॅक्टोबर 2009 रोजी ही घटना घडली होती. गेली 7 वर्षे या खटल्याची कोर्टात सुनावणी सुरू होती. नयना पुजारी खून खटल्यामुळे पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात हा निकाल देण्यात येणार आहे. या खटल्याची सुनावणी कोर्टात सुरू असताना मुख्य आरोपी योगेश राऊत ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीवर परिणाम झाला होता. त्यानंतर राऊतला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा गजांआड केले. राऊतला पळून गेल्याच्या प्रकरणात कोर्टाने सहा वर्षे शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात आरोपी राजेश चौधरी याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदवण्यात आला होता. बचाव पक्षातर्फे त्यावर हायकोर्टात हरकत घेण्यात आली होती. मात्र हाय कोर्टाच्या आदेशानंतर चौधरी माफीचा साक्षीदार होण्यावर शिक्कामोर्तब झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या