पुणे, 11 जुलै: पुण्यात (Pune district) अजूनही कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात (Pune Corona Virus) तेच निर्बंध (Lockdown) कायम ठेवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन (flouting Covid-19 norms on weekends) करणारे आणि शनिवार-रविवारी पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईअंतर्गत पुणे पोलिसांनी 400 हून अधिक लोकांकडून दंड (Over 400 people fined) आकारला आहे. शनिवारी (10 जुलै) संध्याकाळपर्यंत कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 424 जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी एका दिवसात जवळपास 1,99,600 दंडाची रक्कम गोळा केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं या संदर्भातली माहिती दिली आहे. शनिवार आणि रविवार विकेंन्ड लॉकडाऊन असूनही, लोणावळ्यात अनेक लोकांनी गर्दी केली. आम्ही लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. निर्बंध असतानाही लोणावळ्यात येणाऱ्या 100 पर्यटकांवर कारवाई करत पोलिसांनी 47 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनीही माहिती दिली आहे. हेही वाचा- चिंताजनक! देशातल्या कोरोना संक्रमणासंदर्भात धक्कादायक खुलासा पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड किल्ला, पानशेत धरण, भोर, वेल्हा, कामशेत आणि जुन्नर यासारख्या प्रसिद्ध मान्सून पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सकाळपासूनच पोलिसांनी जिल्ह्यातील 424 पर्यटकांकडून दंड आकारण्यात आला आहे. या दंडाची रक्कम जवळपास 1 लाख 99 हजार 600 रुपयांवर गेली आहे. पुण्यात निर्बंध जैसे थेच पुणे शहर आणि जिल्ह्यात निर्बंध जैसे थे राहणार आहे. दुकानांची सकाळी 8 ते दुपारी 4 ची मुदत संपल्यावरही फेरीवाले, हातगाडीवाले फिरतायत त्यांना फिरू देऊ नका. तसंच 5 वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर जर दुकाने उघडी राहिली, नागरिक फिरताना दिसले तर कडक कारवाई करा असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी काल कोरोना आढावा बैठकीनंतर दिले आहेत. हेही वाचा- “बीजेपी विधायक ने मुझे थप्पड़ मारा”, यूपी पोलीस अधिकाऱ्याचा Viral Video अजित पवारांनी घेतली आढावा बैठक पुण्यातील कोरोनाच्या स्थितीची आढावा बैठक (Pune Covid situation review meeting) घेतल्यावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे. लसीकरण सुरू आहे मात्र, नागरिकांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कारण, आज एक गोष्ट प्रकर्षाने समोर आला आहे तो म्हणजे कोविड प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हे सर्व गांभीर्याने घ्या असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना दिला आहे.